प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

जर तुम्ही एखादी नवी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायाचा विचार करत असल्यास तर थोडे थांबा. कारण येत्या पुढील वर्षात 5 स्टार रेफ्रिजरेटर्स आणि एसीच्या किंमतीत 6 हजार रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. पीटीआय यांनी दिलेल्या वृत्तानुसार, उद्योग संघटना CEAMA यांनी असे म्हटले आहे की, एनर्जी लेव्हलिंग नॉर्म्स पुढील वर्षापासून सुरु होणार आहे. त्यानुसार वस्तूंच्या उत्पादनासाठी 5 स्टार रेफ्रिजरेटर्स आणि एसीसाठी पारंपरिक फोमच्या जागी वॅक्युम पॅनल्स यांचा वापर केला जाणार आहे.

तसेच फोस्ट फ्री आणि डायरेक्ट कुलिंग मध्ये एक स्टार बदल करण्यात येणार आहे. हे बदल येत्या 2020 पासून लागू केले जाणार आहेत. या बदलावानंतर 5 स्टार रेफ्रिजरेटर्स बनवणे जवळजवळ 6 हजार रुपयांनी महागणार आहे. याबाबत माहिती देत सीईएएमए यांचे अध्यक्ष कमल नंदी यांनी असे म्हटले आहे की, एफिसिएन्शी नॉर्ममध्ये जानेवारी महिन्यापासून होणाऱ्या बदलावामुळेट उद्योगात फाइव्ह स्टार रेफ्रिजरेटर आणणे मुश्किल होत आहे. गेल्या आर्थिक वर्षातच्या पहिल्या सहा महिन्यात एसीच्या विक्रित 15 टक्क्यांनी वाढ झाली होती.(Budget 2019: सरकारने अर्थसंकल्पातील 'या' गोष्टीची शिफारस केल्यास महागणार इलेक्ट्रॉनिक वस्तू?)

तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर काही कंपन्या स्टारच्या माध्यमातून ते प्रोडक्ड किती उत्तम आहे याची ओळख करुन देतात. तसेच ज्या उपकरणांवर स्टार्स असतात ते कमी उर्जा वापरतात. तर सध्या ओव्हन वरील किंमत 2 हजारापर्यंत वाढणार आहे. तर वॉशिंग मशीनवरील किंमत 1 हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर दरवाढ केल्यास ग्राहक याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.