सध्या हेल्पलाईनच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तर नुकत्याच मुंबईतील एक महिलेची फसवणूक करत तिच्याकडून 40 हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला होता. त्या महिलेची चुकी एवढीच होती की तिने HP गॅस कंपनीच्या खोट्या हेल्पलाईन क्रमांकावर फोन केला होता. फोन केल्यानंतर तिला कस्टमअर केअर एग्जिक्युटिव्हने एक लिंक पाठवत त्यामध्ये महत्वाची माहिती देण्यास सांगितली. यावर महिलेने लिंक ओपन केली असता त्यांच्या बँक खात्यामधून चार ट्रान्झाएक्शन होत 40 हजार रुपयांची चोरी झाली.
या पद्धतीची ग्राहकांची फसवणूक करण्याठी UPI पेमेंट्स रिक्वेस्ट किंवा व्हॉट्सअॅपवर एक QR कोड पाठवत त्याचा उपयोग पैशांची चोरी करण्यासाठी करतात. नुकत्याच फसवणुकीच्या घटनांबाबत बोलायचे झाल्यास गुगल आणि जस्ट टायलवर दिलेल्या चुकीच्या कस्टमर केअर क्रमांकामुळे फसवणुक करणाऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. तर जाणून घ्या हेल्पलाईनच्या नावाखाली फोन आल्यास काय करावे आणि त्यापासून कसा बचाव कराल.
-कधीही कोणत्याही व्यक्तिसोबत तुमचा कार्ड क्रमांक, एक्सपायरी डेट, पिन, ओटीपी या गोष्टी शेअर करु नका.
-एखाद्याकडून तुम्हाला पैसे घ्यायचे असल्यास Pay किंवा UPI पीन एन्टर करावा.
-थर्ड पार्टी अॅप सारखे स्क्रिनशेअर, अॅन्टीडेस्क, टीमव्युअर इन्स्टॉल करु नका.
-गुगल, फेसबुक किंवा ट्वीटरवर देण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर कधीच फोन करु नका.
-कोणत्याही अज्ञात पत्त्यावरुन आलेल्या Email किंवा टेक्स मेसेजवरील लिंकवर क्लिक करु नका.
(हॅक करुन हेरगिरी करण्यासाठी वापरले जातात 'हे' स्मार्टफोन, आधीच सावध रहा)