हॅक करुन हेरगिरी करण्यासाठी वापरले जातात 'हे' स्मार्टफोन, आधीच सावध रहा

सध्या गेल्या काही दिवसांपासून डेटा लीक होण्याची प्रकरणे अधिकाधिक वाढली आहेत. त्यानुसार आता एका रिपोर्टनुसार जगातील काही पॉप्युलर स्मार्टफोन हॅक करुन त्यांचा हेरगिरीसाठी उपयोग केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

हॅक करुन हेरगिरी करण्यासाठी वापरले जातात 'हे' स्मार्टफोन, आधीच सावध रहा
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

सध्या गेल्या काही दिवसांपासून डेटा लीक होण्याची प्रकरणे अधिकाधिक वाढली आहेत. त्यानुसार आता एका रिपोर्टनुसार जगातील काही पॉप्युलर स्मार्टफोन हॅक करुन त्यांचा हेरगिरीसाठी उपयोग केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सिक्युरिटी रिसर्च यांनी असे सांगितले आहे की, Bluetooth आणि USB सारख्या एक्ससरिजचा वापर करुन एखाद्या युजर्सचा स्मार्टफोन हॅक केला जातो. त्याचसोबत AT कमांडचा सुद्धा आधार घेतला जातो. स्मार्टफोनमध्ये एटी कमांडचा उपयोग करुन बेसबॅन्ड सॉफ्टवेअर सोबत कम्युनिकेशन करण्याठी वापरला जातो.

रिपोर्टनुसार हॅकर्स या ट्रिकचा विविध प्रकारे उपयोग करु शकतात. म्हणजेच IMEI आणि IMSI क्रमांक, कॉल्समध्ये व्यत्यय, फोन दुसऱ्या क्रमांकावर डायवर्ड करणे, कॉलिंग फिचर ब्लॉक करणे किंवा इंटरनेट एक्सेस बंद करण्यासाठी हॅकर्स एटी कमांडचा वापर करतात. तर टेक वेबसाईट TechCrunch यांनी दिलेल्या रिपोर्टमते, पुढील स्मार्टफोन हॅक करुन हेरगिरी केली जात असल्याची बाब समोर आली आहे.(तुमच्या न कळत बँक खात्यामधून पैसे काढतात 'हे' App, स्मार्टफोनमधून लगेच करा डिलिट)

हेरगिरीसाठी वापरले जाणारे स्मार्टफोन:

Samsung Galaxy S8+, Samsung Galaxy S3, Samsung Note 2, Huawei P8 Lite, Huawei Nexus 6P, Google Pixel 2, LG G3, LG Nexus 5, Motorola Nexus 6 आणि HTC Desire 10 Lifestyle

सर्व स्मार्टफोनमध्ये एक बेसबॅन्ड प्रोसेसर आणि एक अॅप्लिकेशन प्रोसेसर देण्यात येतो. तर AP एक साधारण प्रोसेसर असून ते बेसबॅन्ड प्रोसेरसचे काम सेल्युलर कनेक्टिव्हिटीसाठी रेडिओ संबंधित काम करतात. अॅप्लिकेशन प्रोसेसर बेसबॅन्ड प्रोसेसर सोबत जोडण्यासाठी AT कमांड देतो. त्यामुळे हॅकर्स या पद्धतीचा उपयोग करुन युजर्सचा डेटा किंवा स्मार्टफोन हॅक करुन हेरगिरी केली जाते.

(The above story first appeared on LatestLY on Nov 10, 2019 01:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).