तुम्ही सुद्धा 'हे' पासवर्ड वापरत आहात? सावधगिरी बाळगा, अन्यथा तुमची गोपनिय माहिती होईल हॅक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

सायबर क्रिमिनल्स सध्या कोणत्याही युजर्सचा डेटा अगदी सहजतेने हॅक करत आहेत. त्यासाठी हॅकर्स युजर्सची संपूर्ण माहिती घेत त्याच्या पासवर्ड चोरी करतात. हॅकर्स अशा गोष्टींची चोरी करतात ज्या गोष्टी एखाद्याच्या विरोधात कटकारस्थान करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. परंतु काहीवेळेस हॅकर्सला युजर्सचा पासवर्ड हॅक करणे सोपे होते. कारण काहीजण त्यांच्या पासवर्ड बाबत अधिक निष्काळजीपणाने वागतात. सायबर सिक्योरिटी फर्म ImmuniWeb यांच्या एका लेटेस्ट रिसर्चच्या नुसार, जगातिल 500 उत्तम कंपन्यांमधील करोडे युजर्सचे अकाउंट हॅक करण्यात आले आहेत.

रिपोर्टमध्ये असे ही सांगण्यात आले आहे की, हॅक करण्यात आलेल्या अनेक युजर्सचे पासवर्ड एकसारखेच होते. म्हणजेच त्यांनी युजर्सची गोपनिय माहिती सहज हॅक करता आली. तसेच बहुतांश अकाउंट्सचे पासवर्ड सोप्या पद्धतीचे असल्याचे ही सांगण्यात आले आहे. तर जाणून घ्या कोणते होते पासवर्ड आणि त्याचा वापर करत असल्यात तुमची गोपनिय माहिती हॅक होईल. त्यामुळेच आधीच सावधगिरी बाळगा.

>>हॅक करण्यात आलेले पासवर्ड: 000000, 111111, 112233, 123456, 12345678, 123456789, 1qaz2wsx, 3154061, 456a33, 66936455, 789_234, aaaaaa, abc123, career121, carrier, comdy, cheer!, cheesy, Exigent, old123ma, opensesame, pass1, passer, passw0rd, password, password1, penispenis, snowman, !qaz1qaz, soccer1, student आणि welcome असे होते.(हॅकिंग पासून वाचण्यासाठी Google कडून क्रोम ब्राउडजर अपडेट करण्याचा सल्ला)

त्यामुळे हॅकर्सपासून तुमच्या पासवर्डचा बचाव करण्यासाठी एकाच अनुक्रमाने येणरे अक्षर किंवा क्रमांक ठेवू नये. नेहमी अल्फा न्युमेरिक कॅरेक्टर मध्ये तुमचा पासवर्ड सेट करा. त्याचसोबत एका स्पेशल कॅरेक्टरचा सुद्धा वापर पासवर्ड मध्ये करा. लक्षात असून द्या तुम्ही एक साधारण पासवर्ड तयार केला असल्यात तो हॅक होण्याची शक्यता 200 पट अधिक असते.