जगभरात क्रोम ब्राउजरचे (Chrome Browser) लाखो युजर्स आहेत. त्यापैकी जर तुम्ही सुद्धा क्रोम वापरत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण गुगलने त्यांच्या क्रोम ब्राउजर युजर्सला ते अपडेट करावे असा सल्ला दिला आहे. त्यासाठी एक नवे फिक्स रोलआउट केले आहे. त्यामुळे हॅक होण्यापासून बचाव करणार आहे. ब्राउजर अपडेट न केल्यास हॅकर्सकडून तुमचे डिवाईस हॅक करण्याची शक्यता फार असते. डिजिटल ट्रेन्ड्सकडून असे सांगण्यात आले आहे की, झीरो डे वल्नरबिलिटी नीट करण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्ये एक ब्राउजर ऑडिओ कंपोनेंट आणि PDFFim लायब्रेरीला प्रभावित करतात.
जुन्या क्रोम वर्जनमध्ये हँकिंगची शक्यता फार होती. हॅकर्स सहजतेने ब्राउजर मेमरीमध्ये डेटा स्टोर करुन करप्ट किंवा मोडिफाय करु शकतात. ही गोष्ट हॅकर्स तेव्हा करतात ज्यावेळी त्यांच्याकडे डिवाइसची संपूर्ण माहिती असते. गुगलचे असे म्हणणे आहे की, यापासून वाचण्यासाठी फिक्स रोलआउट करण्यात आले आहे. येत्या काळात ते सर्व युजर्सला वापरता येणार आहे. जर तुम्हाला क्रोमचे अपडेट पहायचे असल्यास क्रोम बाउजरच्या वरच्या बाजूला देण्यात आलेल्या तीन डॉट वर क्लिक करा. त्यानंतर Help मध्ये जाऊन About Google Chrome ऑप्शन पहावे.(शासकीय अधिकाऱ्यांसह 20 देशातील सैनिकांच्या WhatsApp ची झाली हेरगिरी: रिपोर्ट)
क्रोम बाबत बोलायचे झाल्यास कंपनीने आयओएस, मॅक, विंडोज आणि Linux च्या ब्राउजरला Chrome 78 सह अपडेट केले आहे. आयफोन युजर्सला हे अपडेट त्यांच्या सिस्टमला वाइड डार्क मोड दिला आहे. तसेच डार्क मोड करण्यासाठी New Tab Page सह दुसऱ्या मेन्यू ऑप्शन मध्ये सुद्धा पहाता येणार आहे. युजर्सला बुकमार्क, हिस्ट्री, रिसेट टॅब्स आणि रिडिंग लिस्ट मध्ये सुद्धा एक नवे डिझाइन उपलब्ध करुन दिले आहे.