Android फोन चा पासवर्ड विसरलात? या काही सोप्प्या स्टेप्स फॉलो करून क्षणात करा अनलॉक
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit : Pixabay)

मागील काही दशकांपासून स्मार्टफोन (Smart Phone) म्हणजे चैनीची वस्तू नसून प्राथमिक गरज बनला आहे, चार वर्षांचा चिमुकला असो, वा शंभरीच्या टप्प्यातील वृद्ध प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन फोन हा असतोच, या एवढ्याश्या साधनात तुमच्या खाजगी मॅसेजेस पासून ते महत्वाच्या फाईल्स पर्यंत सर्व गोष्टी बोटाच्या क्लिकवर जतन केलेल्या असतात, अशा वेळी आपल्या फोनची प्रायव्हसी जपून राहावी यासाठीच पॅटर्न लॉक (Pattern Lock) , पासवर्ड (Password) यासारखे पर्याय वापरले जातात, आपला फोन कोणीही वापरू नये हा हेतू या पासवर्डच्या पर्यायाने नक्कीच साध्य होतो पण हा पासवर्ड जर का तुम्ही स्वतःच विसरलात तर पुरती पंचाईत होऊन बसते. आता चोरीला गेलेले मोबाईल फोन पुन्हा वापरणे शक्य होणार नाही; देशात सुरु होणार नवी यंत्रणा

पण चिंता करू नका, यापुढे तुमचा फोन लॉक झाल्यास या काही सोप्प्या स्टेप्स फोल्लो करून तुम्ही काही क्षणातच तुमचा फोन अनलॉक करू शकता..

 

डिव्हाईस मॅनेजरची मदत (Device Manager) 

- Android Phone चा वापर करत असाल तर फोन लॉक झाल्यानंतर अ‍ॅन्ड्राईड डिव्हाईस मॅनेजरची मदत घेऊ शकता. जेव्हा तुम्ही फोन विकत घेता तेव्हाच फोन सोबत गुगल अकाउंट सोबत लिंक केले जाते, त्यामुळे तुमच्या फोनमधील माहिती त्यात सेव्ह होत असते.

- संगणकावरून जीमेल अकाऊंट लॉग इन करा.

- अ‍ॅन्ड्राईड डिव्हाईस मॅनेजरमध्ये तुमचं डिव्हाईस सर्च करा. व तिथून अनलॉक करता येईल

- यासाठी इंटरनेट कनेक्शनची गरज आहे.

फॉरगेट पासवर्ड (Forgot Password) 

- फोनचा लॉक पॅटर्न विसरला असाल किंवा इतर कोणीतरी पॅटर्न बदलला असेल तर फॉरगेट पासवर्डच्या मदतीने पॅटर्न बदला.

- फॉरगेट पासवर्ड बदलण्यासाठी जीमेल अथवा गुगल अकाऊंटची माहिती द्या.अलीकडे पासवर्ड सेट करताना तुम्हाला अनेक फोनमध्ये तुमच्या शाळेचं नाव किंवा तत्सम प्रश्न विचारलेला असतो, फॉरगेट पासवर्ड वर क्लिककेल्यावर तुम्हाला तो प्रश्न विचारला जाईल त्याचे उत्तर दिल्यावर तुमचा फोन अनलॉक होतो.

- अन्यथा तुमच्या गुगल अकाऊंटवर एक ई-मेल येईल. त्यावर क्लिक केल्यास नवा पॅटर्न सेट करू शकता.

वेबसाईटचा घ्या आधार

- जर का तुमच्याकडे सॅमसंग कंपनीचा फोन असेल तर, तुमच्या संगणकावर Find My Mobile ही वेबसाईट सुरु करा.

-या वेबसाईटवर उजव्या बाजूला वर तुमचा आताच फोनचे मॉडल व संपरक क्रमांक दिलेला असेल, तर डावीकडे Unlock my device असा पर्याय दिलेला असेल त्यावर क्लिक करा.

-तुमच्या सॅमसंग अकाउंटचा पासवर्ड टाकून तुम्ही पुन्हा तुमचा फोन अनलॉक करू शकाल.

झटपट उपाय

-फोनची स्विच ऑन होताच वॉल्यूम बटण, होम आणि पॉवर बटण एकत्र दाबा.

- असं केल्यास स्क्रीनवर काही पर्याय दिसतील. त्यामध्ये फॅक्ट्री रीसेटचा देखील एक पर्याय मिळेल.

- फॅक्ट्री रिसेट सिलेक्ट केल्यास फोन नव्या सिस्टमप्रमाणे काम करण्यासस सुरुवात करेल.

-लॉक झालेला फोन अनलॉक करण्यासाठी ही सर्वात सोपी पद्धत आहे. मात्र हे करताना डेटा डिलीट होण्याची शक्यता ही अधिक असते.

अनेकदा फोनचा पासवर्ड विसरल्यावर किचकट प्रक्रिया करावी लागते तसेच यात खूप खर्च देखील होतो, आणि इतकं करूनही फोनमधील डेटा अनेकदा गहाळ होण्याची शक्यता असते,त्यामुळे कोणतीही प्रक्रिया करण्याआधी नीट विचार करून संयमाने कृती करा.