Google Incognito (Photo Credits-Twitter)

जर तुम्ही Google Incognito चा वापर करत असल्यास ही तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. काही जण या भ्रमात राहतो की, जर आपण Incognito मोडचा वापर केल्यास ब्राउजिंग हिस्ट्री कोणीही ट्रॅक करु शकत नाही. मात्र या भ्रमात तुम्ही राहू नका. कारण सुरक्षिततेच्या कारणास्वत हे मोड युजर्ससाठी धोकादायक ठरु शकते. तुम्हाला हे समजून घेण्याची गरज आहे की Incognito मोड तुमच्या ऑनलाईन प्रायव्हसीसाठी खरंच सुरक्षित आहे की नाही.(YouTube ने 6 महिन्यात हटवले तब्बल 30 हजार व्हिडीओ; समोर आले 'हे' कारण)

येथे तुम्ही जे काही ब्राउज करता त्याची माहिती गुगला असते. हे प्रकरण अशा वेळी समोर आले जेव्हा तीन युजर्सने गुगलना कोर्टात खेचले. या तिन्ही युजर्सचा डेटा Incognito मोडमध्ये ब्राउज केल्यानंतर सुद्धा ट्रॅक केला जात होता. गुगला हे प्रकरण संपवायचे होते. कारण यामागी कारण अगदी सोप्पे होते. गुगलचे असे म्हणणे होते की, युजर्सला आधीपासूनच Incognito मोड बद्दलचा खरा अर्थ माहिती नव्हता.

ज्या युजर्सकडून गुगलवर आरोप लावला आहे की Incognito वापरणाऱ्या युजर्सचा डेटा आणि लोकेशन कंपनीकडून ट्रॅक केला जात आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले आहे की, कॅलिफोर्नियाचे जिल्हा न्यायाधीश लूसी कोह यांनी असे म्हटले आहे की, गुगलने Incognito मोडच्या माध्यमातून खासगी डेटा एकत्रित करत तो मिळवला आहे. याबद्दल युजर्सला सांगण्यात सुद्धा आले नव्हते. या प्रकरणी असे म्हटले जात आहे की, गुगलला पाच बिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 36,370 करोड रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.(WhatsApp चॅट लीक होण्याची भीती होणार दूर; कंपनी लवकरचं अपडेट करत आहे 'हे' फीचर)

पण गुगलचे असे म्हणणे आहे की, Incognito मोडचा अर्थ Invisible असा होत नाही.क्रोम युजर्सला हे कळले पाहिजे की त्यांचा डेटा ट्रॅक केला जात आहे. कॅलिफोर्नियातील न्यायाशीधांनी हे स्पष्ट केले आहे की, ते कंपनीवर करण्यात आलेला खटला रद्द करणार नाहीत. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, अमेरिकेच्या डिस्ट्रिक्ट न्यायाधीश लूसी कोह यांनी असे म्हटले गुगलने त्यांच्या युजर्सला याबद्दल कोणतीच माहिती दिली नव्हती आणि ते डेटा ट्रॅक करत होते. परंतु गुगलने त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.