Anukul Roy

IPL 2022 चा 47 वा सामना कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात खेळला जात आहे. यासाठी कोलकाताने प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल केले आहेत. कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सांगितले की, अनुकुल रॉयला (Anukul Roy) प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.  अनुकुल केकेआरकडून पदार्पण सामना खेळत आहे. आपल्या दमदार कामगिरीसाठी ओळखला जाणारा अनुकुल याआधी आयपीएलमध्ये फक्त एकच सामना खेळला आहे. पण केकेआरने त्याच्यावर विश्वास व्यक्त करत लिलावात तो विकत घेतला होता. अनुकुलने भारताच्या अंडर-19 संघात राहून अप्रतिम कामगिरी केली आहे. यासह तो झारखंड, बिहार, इंडिया बी आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.

2022च्या आयपीएल लिलावात केकेआरने त्याला 20 लाख रुपयांना विकत घेतले होते. ही त्याची आधारभूत किंमत होती. अनुकुल यापूर्वी मुंबई संघाचा भाग होता.  मुंबईसाठी त्याला केवळ एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. तो IPL 2018 पासून मुंबईशी संबंधित होता. अनुकूल संधी मिळाल्यावर अष्टपैलू खेळाडू स्वत:ला चांगले सिद्ध करण्यास चुकत नाहीत. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांच्या 28 डावांमध्ये 729 धावा केल्या आहेत. हेही वाचा IPL 2022 Orange Cap Updated List: ऑरेंज कॅपवर बटलर ‘राज’ कायम; KL Rahul ची आगेकूच तर हैदराबादच्या अभिषेक शर्माचा हार्डक पांड्याला धक्का

यादरम्यान त्याने दोन शतके आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत. यासोबतच या फॉरमॅटमध्ये 50 विकेट्सही घेतल्या आहेत. अनुकुलने लिस्ट ए च्या 27 डावात 695 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 34 विकेट्स घेतल्या आहेत. 31 टी-20 सामन्यात 304 धावा करताना त्याने 19 विकेट्सही घेतल्या आहेत.