
IPL 2022 Orange Cap: आयपीएल (IPL) 2022 व्या हंगामात आतापर्यंत फक्त एक सामना झाला आहे परंतु खेळाडूंमध्ये ऑरेंज कॅपची शर्यत आधीच सुरू झाली आहे. गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने ऑरेंज कॅपचा मान मिळवला होता. गायकवाडने 16 सामन्यात एकूण 635 धावा केल्या. तर त्याचा माजी चेन्नई सलामी जोडीदार फाफ डु प्लेसिस तितक्याच सामन्यात 633 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. जर आपण दरवर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांविषयी चर्चा केली तर त्यात विदेशी खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण 13 हंगाम खेळले गेले आहेत. ज्यामध्ये चार वेळा भारतीय खेळाडूंनी ऑरेंज कॅप (IPL Orange Cap) काबीज केली आहे, तर नऊ वेळा परदेशी खेळाडूंच्या डोक्यावर ऑरेंज कॅप सजली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात आजवर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर याने (David Warner) सर्वाधिक ऑरेंज कॅपवर आपले नाव कोरले आहे. (IPL 2022 Points Table: सीझन ओपनरमध्ये CSK विरुद्धच्या विजयासह KKR पॉईंट टेबलमध्ये नंबर 1)
आयपीएल 15 ऑरेंज कॅप खेळाडूंची यादी
सनरायझर्स हैदराबाद
क्रमवारी | प्लेअर | संघ | सामने खेळले | धावा |
1 | जोस बटलर | राजस्थान रॉयल्स | 15 | 718 |
2 | केएल राहुल | लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 537 |
3 | क्विंटन डी कॉक | लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 502 |
4 | शिखर धवन | पंजाब किंग्स | 14 | 460 |
5 | फाफ डु प्लेसिस | रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर | 14 | 453 |
2008 मध्ये ऑरेंज कॅपवर ऑस्ट्रेलियन फलंदाज शॉन मार्शने कब्जा केला होता. त्याने किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत 616 धावा केल्या. यानंतर 2009मध्ये मॅथ्यू हेडन, 2010मध्ये सचिन तेंडुलकर, तर 2011 आणि 12मध्ये क्रिस गेल यांनी हा सन्मान पटकावला. 2013 मध्ये माइकल हसी, 2014 मध्ये रॉबिन उथप्पा, 2015 मध्ये वॉर्नर, 2016 मध्ये विराट कोहली, 2017 मध्ये पुन्हा वॉर्नर, 2018 मध्ये केन विल्यमसन आणि 2019मध्ये पुन्हा वॉर्नर ऑरेंज कॅप मिळवण्यात यशस्वी ठरला. यानंतर, 2020 मध्ये केएल राहुलच्या डोक्यावर ऑरेंज कॅप सजली होती.