IPL 2022 Purple Cap Updated List: पर्पल कॅपवर पुन्हा Yuzvendra Chahal चा ताबा, हसरंगा दुसऱ्या क्रमांकावर घसरला
आयपीएल 2022 पर्पल कॅप (Photo Credit: File Photo)

IPL 2022 Purple Cap Updated List: शनिवार, 26 मार्चपासून आयपीएलच्या 15व्या हंगामाला सुरुवात झाली असून, यावेळी 10 संघ आयपीएलमध्ये (IPL) सहभागी होत आहेत. आयपीएलच्या फॉरमॅटमध्येही थोडा बदल करण्यात आला आहे. यावेळी आयपीएल संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येकी पाच संघांना दोन गटात विभागले गेले आहे. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 चा आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला गेला असून खेळाडूंमध्ये पर्पल कॅपची (Purple Cap) शर्यतही सुरु झाली आहे. गेल्या वर्षी ड्वेन ब्रावो याच्या आयपीएलच्या सर्वकालीन विक्रमाची बरोबरी करून हर्षल पटेल याने पर्पल कॅप पटकावली होती. पर्पल कॅपसाठी हर्षलला दिल्ली कॅपिटल्सकडून खेळेल आवेश खान याने चांगली टक्कर दिली होती. अशा परिस्थितीत दरवर्षी प्रमाणे यंदाही खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. (IPL 2022 Orange Cap: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत MS Dhoni अव्वल, अजिंक्य रहाणे देखील दूर नाही)

आयपीएल स्पर्धेच्या अखेर मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात येते. आयपीएलच्या पहिल्या सत्रात, 2008 मध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीर पहिल्या पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. तन्वीरने या मोसमात शानदार गोलंदाजी राजस्थान रॉयल्सकडून एकूण 22 विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएलचा पहिला सत्र राजस्थान संघाने जिंकले होते आणि त्यात सोहेलने मुख्य भूमिका बजावली होती.

Rank Player Team Matches Played Wickets
1 युजवेंद्र चहल राजस्थान रॉयल्स 14 26
2 वानिंदू हसरंगा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 14 24
3 कसिगो रबाडा पंजाब किंग्स 12 22
4 उमरान मलिक सनरायझर्स हैदराबाद 13 21
5 कुलदीप यादव दिल्ली कॅपिटल्स 13 20

डेक्कन चार्जर्सकडून खेळताना आरपी सिंहने 2009 मध्ये पर्पल कॅप काबीज केली होती. यानंतर, 2010 मध्ये प्रग्यान ओझा यांनी पर्पल कॅप ताब्यात घेतला. 2011 मध्ये लसिथ मलिंगा, 2012 मध्ये मॉर्ने मॉर्केल, 2013 मध्ये ड्वेन ब्राव्हो, 2014 मध्ये मोहित शर्मा, 2015 मध्ये ड्वेन ब्राव्हो, 2016 मध्ये भुवनेश्वर कुमार, 2017 मध्ये भुवनेश्वर कुमार, 2018 मध्ये अँड्र्यू टाय आणि 2019 मध्ये इमरान ताहिरने पर्पल कॅप आपल्या नावे केली होती