आता IPL मध्ये 1 लाख रुपये आणि SUV Harrier जिंकण्याची संधी; करावे लागेल फक्त 'हे' काम
SUV Harrier (Photo: Tata Motors/ Twitter)

जर तुम्ही इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 12 व्या सीझनची तिकिटे विकत घेतली असतील तर तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे. मैदानाच्या बाहेर बसून जर का तुम्ही मारलेल्या षटकाराचा बॉल एका हातात पकडून कॅच घेतला, तर तुम्हाला एक लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. बीसीसीआय (BCCI)ने आयपीएलच्या आगामी हंगामात ‘हॅरियर फॅन कॅच’ स्पर्धेची आगाऊ घोषणा केली. या स्पर्धेच्या अंतर्गत प्रत्येक सामन्यात एका हातात कॅच (Single-Handed Catch)घेणाऱ्याला एक लाख रुपये मिळणार आहेत, आणि सर्वात लोकप्रिय कॅच घेणाऱ्याला टाटाची नवीन स्पोर्ट्स युटिलिटी व्हेहिकल हॅरियर (Harrier) जिंकण्याची संधी मिळणार आहे.

सोमवारी, बीसीसीआयने आयपीएलसाठी त्यांचे ऑफिशियल पार्टनर टाटा मोटर्सच्या टाटा हॅरियर एसयूव्हीला आयपीएल-2019 लीड ब्रँड म्हणून घोषित केले. यावेळी बीसीसीआयचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांनी सांगितले की, 'हॅरियरला आयपीएलदरम्यान हॅरियर फॅन कॅच पुरस्कारामध्येही सामील करण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्वोत्कृष्ट कॅच घेणाऱ्या व्यक्तीला ही गाडी मिळणार आहे.' (हेही वाचा: IPL Season 12 भारतामध्येच रंगणार, 23 मार्च 2019 पासून सुरू होणार आयपीएल 12 चे सामने!)

दरम्यान 23 मार्चपासून आयपीएलच्या 12 व्या सिझनला सुरुवात आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघादरम्यान ओपनिंग मॅच पार पडणार आहे. विश्‍वचषकाच्या संघातील बहुतांश खेळाडूंचे स्थान निश्‍चित आहे. तर अन्य खेळाडूची निवड ही या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील कामगिरीच्या जोरावर केली जाईल असे मत विराट कोहलीने व्यक्त केले आहे.