IPL 12 : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League)अर्थातच आयपीएलच्या 12व्या पर्वाचा(IPL Season 12) लिलाव नुकताच पार पडला आहे. यंदा काही महिन्यातच भारतामध्ये लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यामुळे यंदाचे IPL सामने भारताबाहेर खेळले जातील अशी चर्चा होती मात्र मिळालेल्या माहितीनुसार IPL 12 भारतामध्येच रंगणार आहे.
23 मार्चपासून आयपीएलच्या सीझनला सुरूवात होणार आहे. Supreme Court-appointed Committee of Administrators (CoA)ने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकामध्ये सामने भारतामध्येच होतील असे सांगण्यात आले आहे. आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक, स्टेडियम्सची माहिती अद्याप दिली गेलेली नाही. मात्र लोकसभा 2019 च्या तारखा निश्चित झाल्यानंतर आयपीएल 12 व्या सीझनचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. IPL Auction 2019: आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी कोणत्या खेळाडूला किती मिळाला भाव?
NEWS: VIVO IPL 2019 to be played in India.
It is proposed that the league will commence on March 23, 2019.
More details here - https://t.co/eJSBLlbUaf pic.twitter.com/aHI5djBip8
— IndianPremierLeague (@IPL) January 8, 2019
जयपूरमध्ये खेळाडूंचा लिलाव झाला. यामध्ये सुमारे 226 भारतीय आणि 70 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. यंदाच्या पर्वामध्ये भारतीय खेळाडू युवराज सिंग याने त्याची बेस प्राईज कमी केल्याने चर्चा रंगली होती. पहिल्या फेरीत युवराजचं सिलेक्शन झाले नव्हते मात्र नंतर मुंबई इंडियंसकडून युवराज सिंगला विकत घेण्यात आले.