IPL Auction 2019: आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी कोणत्या खेळाडूला किती मिळाला भाव?
Jaydev Undakat, Mohammad Shami and Ishant Sharma (Photo Credits: Twitter)

IPL Auction 2019: इंडियन प्रीमियर लीग 2019 (Indian Premier League 2019) च्या 12 व्या सीजनसाठी आज जयपूर येथे खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात झाली. यात 226 भारतीय आणि 70 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. लिलावाच्या आजच्या पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंना कोट्यावधी किंमतींना विकत घेण्यात आले. तर पाहुया सर्वाधिक भाव मिळालेले टॉप 5 खेळाडू आणि इतर खेळाडूंना लिलावात मिळालेला भाव...

वरुण चक्रवर्ती

किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने वरुणला 8 कोटी 40 लाखाला खरेदी केले.

जयदेव उनाडकट

जयदेव उनाडकटवर राजस्थान रॉयल्सने 8 कोटी 40 लाखाची बोली लावली आहे.

सॅम करन

इंग्लंडचा सॅम करनला पंजाब किंग्ज इलेव्हनने 7 कोटी 20 लाखामध्ये आपल्या संघात सामिल केले आहे.

कॉलिन इन्राग

दिल्ली कॅपिटल्सने साऊथ आफ्रिकेच्या कॉलिन इन्रागवर 6 कोटी 40 बोली लावली.

शिवम दुबे

नुकत्याच झालेल्या रणजी सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या मुंबईकर शिवम दुबे याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 5 कोटींमध्ये विकत घेतले आहे.

कोणत्या संघाने कोणाला खरेदी केले?

#चेन्नई सुपर किंग्ज

मोहीत शर्मा- 5 कोटी

#दिल्ली कॅपिटल्स

अक्षर पटेल- 5 कोटी

हनुमा विहारी- 2 कोटी

इशांत शर्मा- 1 कोटी 10 लाख

#कोलकाता नाईट रायडर्स

कार्लोस ब्रेथवेट- 5 कोटी

#किंग्ज इलेव्हन पंजाब

मोहम्मद शमी- 4 कोटी 80 लाख

निकोलस पुरन- 4 कोटी 20 लाख

मॉईजेस हेन्रिकेस- 1 कोटी

#रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

शिमरॉन हेटमायर- 4 कोटी 20 लाख

#मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्स

बरिंदर सरन- ३ कोटी ४० लाख

लसिथ मलिंगा- 2 कोटी

युवराज सिंग- 1 कोटी

#राजस्थान रॉयल्स

वरुण अॅरोन- 2 कोटी 40 लाख

#सनराईजर्स हैदराबाद

वृद्धीमान साहा- 1 कोटी 20 लाख

चेतेश्वर पुजारा, ब्रेंडन मॅक्युल्म, मार्टिन गप्तील, ख्रिस वोक्स, मनोज तिवारी , अॅलेक्स हेल्स या खेळाडूंना IPL 12 च्या लिलावामध्ये भाव मिळालेला नाही.