IPL Auction 2019 : मुंबई इंडियन्सकडून Yuvraj Singh ची 1 कोटीला खरेदी
Yuvraj Singh (Photo Credits: Facebook)

IPL Auction 2019 : इंडियन प्रीमियर लीग 2019 (Indian Premier League 2019) च्या 12 व्या सीजनसाठी आज जयपूर येथे खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात झाली. लिलावाच्या पहिल्या फेरीत सिक्सर किंग युवराज सिंगवर (Yuvraj Singh) कोणत्याच टीमकडून बोली लावण्यात आली नाही. मात्र आता मुंबई इंडियन्सचे युवराज सिंगच्या बेस प्राईज म्हणजे 1 कोटी रुपयांत खरेदी केले आहे. आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी कोणत्या खेळाडूला किती मिळाला भाव?

पहिल्या सीजनमधील वाईट कामगिरीमुळे युवराज सिंगला (Yuvraj Singh) किंग इलेवन पंजाबने संघात स्थान दिले नाही. मात्र आयपीएलमध्ये स्थान मिळविण्याच्या उद्देशाने त्याने आपली बेस प्राईज घटवली.  त्यानंतर पहिल्या फेरीत युवराज सिंगवर कोणत्याच संघाने बोली न लावल्याने त्याच्या आयपीएलमधील स्थानावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. त्याचबरोबर परदेशी खेळाडूंची कमी संख्या युवराज सिंगच्या पथ्यावर पडू शकते, असाही अंदाज वर्तवण्यात आला होता.