IPL Auction 2019 : आज जयपूरमध्ये IPL च्या 12 व्या हंगामासाठी लिलावाला सुरूवात झाली आहे. 226 भारतीय आणि 70 परदेशी खेळाडूंचा यामध्ये समावेश होता. मात्र भारतीय खेळाडू युवराज सिंगवर (Yuvraj Singh) पहिल्या फेरीमध्ये कोणत्याच टीमकडून बोली लावण्यात आली नाही. आयपीएलमध्ये स्थान मिळविण्याच्या उद्देशाने त्याने आपली बेस प्राईज घटवली होती, परंतू युवराजला कोणीच वाली न मिळाल्याने युवराजच्या आयपीएलमधील प्रवेशावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. IPL 2019-Season 12: युवराज सिंग याच्यासह अनेकांची बेस प्राईज घटली; लिलावाबाबत उत्सुकता
युवराज सिंग यापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांकडून खेळला होता. आगामी वर्ल्डकप स्पर्धेमध्येही युवराजला संधी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून युवराज एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्यामुळे भविष्यात तो लवकरच निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चादेखील रंगल्या होत्या. यामुळेच युवराज सिंगवर IPL 12 मध्ये युवराज सिंगवर बोली लावण्यात आली नसल्याचं म्हटलं जात आहे.
#IPLAuction: Yuvraj Singh, with a base price of Rs 1 Crore, remains unsold. (file pic) pic.twitter.com/l1KtM7QnDy
— ANI (@ANI) December 18, 2018
पहिल्या फेरीत कोणाकोणावर बोली लावण्यात आली नाही?
युवराज सिंग,चेतेश्वर पुजारा,ब्रेंडन मॅक्युल्म,मार्टिन गप्तील,ख्रिस वोक्स,मनोज तिवारी ,अॅलेक्स हेल्स या खेळाडूंवर IPL 12 च्या लिलावामध्ये भाव मिळालेला नाही.
मागील वर्षी सर्वात महागडा खेळाडू म्हणून चर्चेत राहिलेला जयदेव उनाडकटला यंदाही राजस्थान रॉयल्सने 8 कोटी 40 लाख रूपयात विकत घेतले आहे. तर मोहम्मद शमीला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने 4 कोटी 80 लाख रूपयामध्ये विकत घेतले आहे.