IPL 2019-Season 12: युवराज सिंग याच्यासह अनेकांची बेस प्राईज घटली; लिलावाबाबत उत्सुकता
IPL & Yuvraj Singh | (Archived, edited, representative images)

IPL Players Auction 2019: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League)अर्थातच आयपीएलच्या 12व्या पर्वासाठी (IPL Season 12) येत्या 18 डिसेंबरला लिलाव होत आहेत. या लिलावात एक हजारहून अधिक क्रिकेटपटूंवर बोली लागणार आहे. यात अनेक नवोदीत खेळाडूंसोबतच दिग्गज क्रिकेटपटूंचाही समावेश असणार आहे. दरम्यान, वाढती स्पर्धा, बदलती व्यावसायिक गणीत आदींमुळे यातील दिग्गज खेळाडूंनी लिलावावेळी लागणाऱ्या बोलीसाठी आपली किंमत कमी केली आहे. या वेळचे वैशिष्ट्य असे की, 2 कोटी रुपयांच्या बेस प्राईज (Base Price) लिस्टमध्ये या वेळी एकही भारती खेळाडू नाही. प्राप्त माहितीनुसार आयपीएलसाठी लिलावातअसलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये जयदेव उनादकट (Jaydev Unadkat) हा सर्वाधिक बेस प्राईज असलेला खेळाडू आहे. त्याने आपली बेस प्राईज 1.5 इतकी ठेवली आहे. गेल्या वर्षीही उनादकट हा सर्वात महागडा खेळाडू होता. 11व्या पर्वात तो राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाकडून खेळला. मात्र, त्याला फारशी प्रभावी खेळी करता आली नाही.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिग (Yuvraj Singh) याने 12व्या पर्वासाठी आपली बेस प्राईज कमी केली ओहे. आगोदर त्याची बेस प्राईज 2 कोटी रुपये होती. या प्राईजमध्ये कपात करत त्याने आता 1 कोटी रुपये इतकी बेस प्राईज ठेवली आहे. गेल्या वर्षी तो किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) संघाकडून खेळला होता. या संघाकडून त्याची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. पंजाबकडून खेळताना तो एकही शतक ठोकू शकला नाही. दरम्यन, युवराज सिंह याच्याप्रमाणे भारतीय खेळाडू मोहम्मद शमी आणि अक्षर पटेल यांचीही बेस प्राईज 1 कोटी रुपये आहे. (हेही वाचा, Gautam Gambhir या पुढे क्रिकेट खेळणार नाही, केली Retirement ची घोषणी)

आयपीएल पर्व बारासाठी यावेळी बोलीच्या मैदानात असलेल्या एकूण खेळाडूंपैकी 800 खेळाडू असे आहेत जे आयपीएलमध्ये एकदाही खेळले नाहीत. यात 746 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचे 35, वेस्टइंडीजचे 33, श्रीलंका 28, अफगानिस्तान 27, न्यूझीलंड 17, इग्लंड 14 आणि बांग्लादेशच्या 10 खेळाडूंचा समावेश आहे. तर, झिंबाब्वेच्या पाच , हाँकॉंग, आयर्लंड, नेदरलॅंड आणि अमेरिकेच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे.