Gautam Gambhir या पुढे क्रिकेट खेळणार नाही, केली Retirement ची घोषणी
गौतम गंभीर (फोटो सौजन्य- फेसबुक)

भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा करताना भावूक झालेल्या गंभीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

गौतम गंभीरने हा निर्णय घेताना असे म्हटले की, 'मी हा जड अंत:करणाने निर्णय घेतला आहे. बऱ्याच दिवसांपासून याची वाट पाहात होतो. तसेच माझ्या कारकिर्दितील सर्वांचे मला आभार मानायचे आहे' असे त्याने म्हटले आहे.

दोन वर्षापासून संघाबाहेर

गौतम गंभीर गेल्या दोन वर्षापासून टीम इंडियातून बाहेर आहे. काही दिवसांपूर्वी 37 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या गंभीरसाठी संघाचे दरवाजे जवळपास बंदच झाले होते. त्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नांना पूर्णविराम देत त्याने निवृत्ती जाहीर केली.