(File Photo)

महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी शनिवारी आत्मविश्वास व्यक्त केला की देशभरातील विद्यार्थ्यांच्या निषेधांमुळे निर्माण झालेल्या सद्य 'कठीण' परिस्थितीवर भारत मात करेल, व पूर्वीसारख्या अनेक संकटकालीन परिस्थितींना तोंड देण्यास ते सक्षम आहेत असे देखील ते म्हणाले. गेल्या काही आठवड्यांत विद्यार्थ्यांचा निषेध देशभर पाहायला मिळाला. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सर्वप्रथम जामिया मिलिया विद्यापीठात निदर्शने झाली. मुखवटा असलेल्या लोकांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) हिंसाचार पसरविला. आणि या परिस्थितीवर, दिग्गज फलंदाजाने एका कार्यक्रमादरम्यान बोलताना विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे. अलिकडच्या काळात, सीएएवर मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

गावस्कर 26 व्या लाल बहादूर शास्त्री स्मारक व्याख्यानमालेदरम्यान म्हणाले, "देश संकटात आहे. आमचे काही तरुण रस्त्यावर आहेत, जेव्हा ते त्यांच्या वर्गात असले पाहिजेत. त्यातील काही जणांना तर रस्त्यावर उतरण्यासाठी रुग्णालयात जावे लागले."

गावस्कर यांना मात्र अशा भारतावर विश्वास आहे जिथे संकटाच्या काळावर मात करत लोक पुन्हा नव्याने उभे राहतात. ते म्हणाले, “त्यांच्यातील बहुतेक हे अजून विद्यार्थी आहेत जे आपल्या करियरला दिशा देण्याचा  आणि भारताला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा आपण सर्व एकत्र असतो तेव्हाच आपण एक राष्ट्र म्हणून उच्च होऊ शकतो. खेळाने आम्हाला हेच शिकवले."

CAA-NRC विरोधात झालेल्या हिंसाचारात रेल्वेचे 84 कोटींचे नुकसान; कोलकाता उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल

“आम्ही एकत्र प्रयत्न केल्यावरच आम्ही जिंकतो. यापूर्वी भारताने बर्‍याच संकटांवर मात केली. हे यावर मात करेल आणि एक सामर्थ्यवान देश बनेल. आपण सर्वजण एकत्र असल्यावरच आपण एक राष्ट्र म्हणून उच्च जाऊ शकतो,” असंही ते म्हणाले.