UEFA Euro 2020 Schedule in IST: युरोपमध्ये आजपासून सुरु होणार फुटबॉलचे घमासान; जाणून घ्या संपूर्ण फिक्स्चर आणि सामन्यांचे टाइम टेबल
युरो 2020 ट्रॉफी (Photo Credits : Getty Images)

UEFA Euro 2020 Schedule in IST: करोना व्हायरसमुळे गेल्या वेळी स्थगित केलेली युरोपियन फुटबॉल (European Football) स्पर्धा आज, 11 जूनपासून (भारतीय वेळेनुसार 12 जून) सुरू होणार आहे. स्पर्धेच्या 60 वर्षांच्या इतिहासात प्रथमच 11 वेगवेगळ्या शहरांमध्ये सामने होणार आहेत. मूळ स्पर्धा 12 जून ते 12 जुलै 2020 या कालावधीत खेळण्याची योजना होती पण ती पुढे ढकलण्यात आली आणि आता 11 जून ते 11 जुलै 2021 या कालावधीत या स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहेत. टूर्नामेंटच्या सुरुवातीला काही तास शिल्लक असताना आम्ही फुटबॉल चाहत्यांसाठी स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक घेऊन आलो आहोत. पहिल्यांदा संपूर्ण युरोपमध्ये UEFA Euro कपचे आयोजन केले जाणार आहे आणि युरोपियन चँपियनशिप (European Championship) स्पर्धेचा 60 वा "वाढदिवस" साजरा करण्याचा ही एकमेव स्पर्धा असेल. 1960मध्ये पहिल्यांदा युरोपियन फुटबॉल स्पर्धेची सुरुवात झाली होती. (UEFA Euro 2020: इथे जाणून घ्या युरोपमधील फुटबॉलच्या सर्वात मोठ्या टूर्नामेंट बद्दल सगळ्या मोठ्या गोष्टी)

लंडनच्या (London) वेम्बली स्टेडियममध्ये (Wembley Stadium) दुसऱ्यांदा सेमीफायनल आणि अंतिम फेरीचे आयोजन केले जाईल. युरो कप चॅम्पियन पोर्तुगाल आणि फिफा वर्ल्डकप विजेता संघ फ्रान्ससहित सर्व संघांना 6 गटात विभागण्यात आले आहे. यूरो 2020 वेळापत्रक आणि फिक्स्चर लिस्ट:

तारीख मॅच (ग्रुप) वेळ (IST) शहर
12 जून तुर्की vs इटली (ए) 12.30 am रोम
12 जून वेल्स vs स्वित्झर्लंड (ए) 6.30pm बाकू
12 जून­ डेनमार्क vs फिनलंड (बी) 9.30pm कोपेनहेगन
13 जून बेल्जियम vs रूस (बी) 12.30am सेंट पीटर्सबर्ग
13 जून इंग्लंड vs क्रोएशिया (डी) 6.30pm लंडन
13 जून ऑस्ट्रिया vs नॉर्थ मेसेडोनिया (सी) 9.30pm बुखारेस्ट
14 जून नेदरलँड्स vs यूक्रेन (सी) 12.30am एम्सटर्डम
14 जून स्कॉटलंड vs चेक रिपब्लिक (डी) 6.30pm ग्लासगो
14 जून पोलंड vs स्लोवाकिया (ई) 9.30pm सेंट पीटर्सबर्ग
15 जून स्पेन vs स्वीडन (ई) 12.30am सेविया
15 जून हंगरी vs पुर्तगाल (एफ) 9.30pm बुडापेस्ट
16 जून फ्रांस vs जर्मनी (एफ) 12.30am म्यूनिख
16 जून फिनलंड vs रूस (बी) 6.30pm सेंट पीटर्सबर्ग
16 जून तुर्की vs वेल्स (ए) 9.30pm बाकू
17 जून इटली vs स्वित्झर्लंड (ए) 12.30am रोम
17 जून यूक्रेन vs नॉर्थ मेसेडोनिया (सी) 6.30pm बुखारेस्ट
17 जून डेनमार्क vs बेल्जियम (बी) 9.30pm कोपेनहेगन
18 जून स्वित्झर्लंड vs ऑस्ट्रिया (सी) 12.30am एम्सटर्डम
18 जून स्वीडन vs स्लोवाकिया (ई) 6.30pm सेंट पीटर्सबर्ग
18 जून क्रोएशिया vs चेक रिपब्लिक (डी) 9.30pm ग्लासगो
19 जून इंग्लंड vs स्कॉटलंड (डी) 12.30am लंडन
19 जून हंगरी vs फ्रान्स (एफ) 6.30pm बुडापेस्ट
19 जून पोर्तुगाल vs जर्मनी (एफ) 9.30pm म्यूनिख
20 जून स्पेन vs पोलंड (ई) 12.30am सेविया
20 जून इटली vs वेल्स (ए) 9.30pm रोम
20 जून स्वित्झर्लंड vs तुर्की (ए) 9.30pm बाकू
21जून यूक्रेन vs ऑस्ट्रिया (सी) 9.30pm बुखारेस्ट
21 जून नॉर्थ मेसेडोनिया vs नेदरलँड्स (सी) 9.30pm एम्सटर्डम
22 जून फिनलँड vs बेल्जियम (बी) 12.30am सेंट पीटर्सबर्ग
22 जून रूस vs डेनमार्क (बी) 12.30am कोपेनहेगन
23 जून चेक रिपब्लिक vs इंग्लंड (डी) 12.30am लंडन
23 जून क्रोएशिया vs स्वित्झर्लंड (डी) 12.30am ग्लासगो
23 जून स्वीडन vs पोलंड (ई) 9.30pm सेंट पीटर्सबर्ग
23 जून स्लोवाकिया vs स्पेन (ई) 9.30pm सेविया
24 जून जर्मनी vs हंगरी (एफ) 12.30am म्यूनिख
24 जून पुर्तगाल vs फ्रान्स (एफ) 12.30am बुडापेस्ट

प्री-क्वार्टर फायनल्स (अंतिम-16)

तारीख मॅच (ग्रुप) वेळ शहर
26 जून 2nd (ए) vs 2nd (बी) 9.30pm एम्सटर्डम
27 जून 1st (ए) vs 2nd (सी) 12.30 am लंडन
27 जून 1st (सी) vs 3rd (डी/ई/एफ) 9.30pm बुडापेस्ट
28जून 1st (बी) vs 3rd (ए/डी/ई/एफ) 12.30am सेविया
28जून 2nd (डी) vs 2nd (ई) 9.30pm कोपेनहेगन
29 जून 1st (एफ) vs 3rd (ए/बी/सी) 12.30 am बुखारेस्ट
29 जून 1st (डी) vs 2nd (एफ) 9.30pm लंडन
30जून 1st (ई) vs 3rd (ए/बी/सी/डी) 12.30am ग्लासगो

क्वार्टर फायनल्स (QF)

तारीख मॅच वेळ शहर
2 जुलै Winner R16 match 6 vs Winner R16 match 5 9.30pm सेंट पीटर्सबर्ग
3 जुलै Winner R16 match 4 vs Winner R16 match 2 12.30 am म्यूनिख
3 जुलै Winner R16 match 3 vs Winner R16 match 1 9.30pm बाकू
4 जुलै Winner R16 match 8 vs Winner R16 match 7 12.30am रोम

उपांत्य फेरी (SF)

तारीख मॅच वेळ शहर
7 जुलै Winner QF2 vs Winner QF1 12.30 am लंडन
8 जुलै Winner QF4 vs Winner QF3 12.30 am लंडन

फायनल (F)

तारीख मॅच वेळ शहर
12 जुलै Winner SF1 vs Winner SF2 12.30 am लंडन

स्पर्धेच्या गटात 36 सामने, उपउपांत्यपूर्व फेरीत 8, उपांत्यपूर्व फेरीतील 4 सामने खेळले जातील. तसेच 2 सेमीफायनल सामने आणि अंतिम सामन्यासह एकूण 51 सामने खेळले जातील. पोर्तुगाल ज्या गटात आहे त्याला ‘ग्रुप ऑफ डेथ’ म्हणतात. क्रिस्टियानो रोनाल्डोच्या नेतृत्वात पोर्तुगालला गट एफमध्ये स्थान देण्यात आले आहे. यामध्ये विश्वविजेता फ्रान्स, चार वेळा विश्वचषक जिंकणारा जर्मनी आणि हंगेरीचा समावेश आहे.