Tokyo Olympics 2020 Medal Tally Updated: भारत पदक तालिकेत 48 व्या स्थानावर, चीनला पछाडत अमेरिका नंबर-1
टोकियो ऑलिम्पिक 2020 पदक तालिका (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020 Medal Tally: भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज लंडन ऑलिम्पिक खेळातील पदकांचा विक्रम देखील मोडीत काढला. 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी करत 6 पदके जिंकली होती. त्यानंतर आता 2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदके जिंकत, लंडन ऑलिम्पिक पदकांचा विक्रम मोडीत काढला आहे. यंदा ऑलिम्पिकमध्ये मॅडिसन सायकलिंग, बेसबॉल आणि सॉफ्टबॉल खेळांनी पुनरागमन झाले आहेत. रिओ ऑलिम्पिक 2016 प्रमाणे अमेरिका, यूके, चीन, रशिया, जपान आणि जर्मनी हे पदक मिळविण्याकरिता जोरदार झुंज देतील. (Tokyo Olympics 2020: टाळ्यांच्या गडगडाटात जेव्हा मेरी कॉम आणि मनप्रीत सिंह यांनी केले ऑलिम्पिकमध्ये केले भारतीय दलाचे नेतृत्व Watch Video)

मागील रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये अमेरिका गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिले होते. अमरिकेने सर्वाधिक 46 सुवर्ण पदक, आणि एकूण 121 पदकांसह पॉईंट्स टेबलच्या पहिले स्थान पटकावले होते. तसेच ग्रेट ब्रिटनने 27 सुवर्ण पदकांसह दुसरे स्थान मिळविले, आणि त्याची एकूण पदकांची संख्या 67 होती. चीनने 26 सुवर्ण आणि एकूण 70 पदकांसह तिसरे स्थान मिळवले होते. आपण अधिकृत ऑलिम्पिक वेबसाइटवर देखील रिअल-टाइम अपडेटेड पदकाची स्थिती जाणून घेऊ शकता

टोकियो ऑलिम्पिक 2020-21 पदक टेबल

रँक देश सुवर्ण रौप्य कांस्य एकूण पदक
1 युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका 39 41 33 113
2 चीन 38 32 18 88
3 जपान 27 14 17 58
48 भारत 1 2 4 7

टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये 50 विभागांमध्ये एकूण 33 खेळ आणि एकूण 399 स्पर्धा होतील, परिणामी तात्पुरते 330 पदकांचे संच वितरित केले जातील. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग लक्षात घेता यंदा खेळाडूंनी स्वत:च गळ्यात पदक घालावे लागतील. भारताने ऑलिम्पिक इतिहासातील आपला सर्वात मोठ्या खेळाडूंचा दल पाठवला आहे. दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक खेळ आयोजित करण्यासाठी जपान सरकार आपल्याच लोकांच्या निशाण्यावर आली आहे. जपान येथे अनेक ठिकाणी खेळांच्या आयोजनाविरुद्ध निदर्शने केली जात आहेत.