Tokyo Olympics 2020: टाळ्यांच्या गडगडाटात जेव्हा मेरी कॉम आणि मनप्रीत सिंह यांनी केले ऑलिम्पिकमध्ये केले भारतीय दलाचे नेतृत्व (Watch Video)
भारत टोकियो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिक स्टेडियमवर (Olympic Stadium) जगातील सर्वात मोठा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याची (Opening Ceremony) धमाकेदार सुरुवात झाली आहे. खेळाच्या महाकुंभची सुरुवात झाली असून कोरोना महामारीमुळे (Coronavirus Pandemic) यंदा उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रत्येक देशातील कमी खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. या सोहळ्यात भारताचे एकूण 22 खेळाडू आणि काही अधिका्यांचा समावेश होता. बॉक्सर मेरी कॉमने (Mary Kom) आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह Manpreet Singh) यांनी ध्वज वाहक म्हणून उद्घाटन सोहळ्यात नेतृत्व केले. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) ऑलिम्पिक खेळ एका वर्षासाठी स्थगित करण्यात आले होते पण एका वर्षानंतर ओलिंपिक खेळ कोविड-19 महामारी दरम्यान खेळले जाणार आहेत. (Tokyo Olympics 2020 India Schedule: टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे पूर्ण वेळापत्रक, इव्हेंटची वेळ आणि बरेच काही जाणून घ्या)

महामारीमुळे ऑलिम्पिक खेळात बरेच मोठे बदल पाहायला मिळत आहे. खेळाडूंना कोरोना विषाणूच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी एक अतिशय कठोर बायो बबल तयार केला गेला आहे. इतकंच नाही तर टोकियो ऑलिम्पिक प्रेक्षकांशिवाय मैदानावर खेळले जाणार आहे. शिवाय, महामारीने खेळाडूंच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. खेळाडूंना दररोज कोविड-19 चाचणी करावी लागेल आणि अहवालाशिवाय कोणत्याही खेळाडूला मैदानावर प्रवेश मिळणार नाही. इतकेच नाही तर एखाद्या खेळाडूने अंतिम फेरी गाठली असेल आणि त्याचा अहवाल सकारात्मक आला तर त्याला पदकाच्या शर्यतीतून माघार घ्यावी लागेल.

दुसरीकडे, यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय दलाबद्दल बोलायचे तर तब्बल 127 खेळाडू सहभाग घेत आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताचे तिरंदाज आणि बॉक्सर्स मैदानात उतरतील. भारताची स्टार आर्चर दीपिका कुमारी ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी नशीब आजमावत असून तिच्याकडून भारताला सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. याशिवाय तिरंदाजीत तरुणदीप राय, अतानू दास आणि प्रवीण जाधव देखील पदकाचे दावेदार असतील. ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तीन भारतीय बॉक्सर लवलिना, विकास कृष्णन आणि सतीश कुमार स्वतंत्र स्पर्धांमध्ये भाग घेतील.