राष्ट्रीय खेल पुरस्कार (National Sports Awards) विजेत्यांच्या निवड प्रक्रियेस यंदा ओलम्पिक (Olympic) स्पर्धेपर्यंत स्थिगीती दिली जाऊ शकते. जेणेकरुन टोकियो गेम्स पदक विजेत्यांच्या नावांवरही निवड समिती विचार करु शकेन. आतापर्यंत निवड समितीचीही नेमणूक करण्यात आली नाही. राष्ट्रपती हे पुरस्कार प्रतिवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day) औचित्य साधत देत असतात. 29 ऑगस्ट या दिवशी ख्यातनाम हॉकीपटू मेज ध्यानचंद यांची जयंतीही असते. दरम्यान, ऑलिम्पीक खेळांचे आयोजन 23 जुलै ते 8 ऑगस्ट या काळात केले जाणार आहे.
क्रीडा मंत्रालयातील एका सूत्राच्या हवाल्याने वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसर, यंदाच्या वर्षी राष्ट्रीय खेळ पुरस्कारांसाठी नामांकने मिळाली आहेत. आता नामांकनाची तारीख उलटून गेली आहे. परंतू, पाठिमागच्या बैठकीत यंदाच्या पुरस्कारासाठी ओलम्पिक पदक विजेत्यांच्या नावाचा विचार करण्यावर चर्चा केली होती. अर्थात, जर कोनी पदक जिंकले तरच. ओलम्पिक आठ ऑगस्टला समाप्त होत आहेत. त्यमुळे पुरस्कार विजेत्यांच्या नावाची निवड करण्याच्या प्रक्रियेस विलंब होऊ शकतो. ऑलिंम्पीक आठ ऑगस्ट रोजी समाप्त होत आहेत आणि जर निवड समितीने खेळ समाप्त होण्याच्या 10 दिवसांत नावांच्या यादीला अंतिम स्वरुप दिले नाही तर कार्यक्रमास विलंब होणार आहे.
सूत्रांचा हवाला देत वृत्तात पुढे म्हटले आहे की, या विषयावर आम्ही लवकरच निर्णय करु. त्यासाठी ओलम्पिक नंतर एक तातडीची बैठक घेण्याचा विचार आहे. जर एखाद्या खेळाडूने ओलम्पिक स्पर्धेत पदक मिळवले तर त्याच्या नावाचा पुरस्कारासाठी नक्कीच विचार होईल. पीटीआयच्या वृत्तात सूत्रांनी पुढे मह्टले आहे की, एक आठवडा अथवा 10 दिवसांच्या कालावधीत बैठकीचे आयोजन केल्यास पुरस्कार 29 ऑगस्टला दिले जातील. अन्यथा त्यातही विलंब होऊ शकतो. (हेही वाचा, National Sports Awards 2020: यंदा वर्चुअल समारंभात होणार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण, सात्विकसाईराज रंकीरेड्डीसह 3 कोरोना पॉसिटीव्ह विजेते ऑनलाईन सोहळ्याला मुकणार)
कोरोना व्हायरस महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या अत्यंत कडक नियमांना डोळ्यासमोर ठेऊन भारतातील 120 पेक्षाही अधिक खेळाडू ओलम्पिक स्पर्धेत सहभागी होतील. तसेच, या स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी प्रयत्न करतील. दरम्यान, ओलम्पिक सामन्यांवेळी प्रेक्षकांना प्रेश्रागॅलरीत येण्यास अनुमती नाही.