
भारताची स्टार टेनिसटू सानिया मिर्झा (Sania Mirza) 2010 मध्ये पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघाचा खेळाडू शोएब मलिक (Shoaib Malik) याच्यासह विवाह बंधनात बंधली. आज सानिया आणि शोएबचा मुलगा एक वर्षाचा झाला आहे. सानियाने मुलगा इझहान (Izhaan) च्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर फोटो शेअर केला आहे. सानियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलाच्या वाढदिवसाचा आनंद व्यक्त केला आणि एक अत्यंत सुंदर फोटो शेअर केला. सानियाने एका खास अंदाजात मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिच्या पहिल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवशी सानियाने सुरुवातीच्या दिवसांचा फोटो शेअर करत एक लांब पोस्ट लिहिलेली आहे. इंस्टाग्रामवर आपल्या मुलाचा जन्माच्या वेळेचा फोटो शेअर करताना सानियाने बुधवारी, 30 ऑक्टोबर रोजी लिहिले की, "एक वर्षांपूवी तू या जगात आला आणि आमचे जग बनला..." (गर्भधारणा नंतर सानिया मिर्झा ने कमी केले 26 किलो वजन, शेअर केला प्रेरणादाई Workout व्हिडिओ)
सानियाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “अगदी एक वर्षापूर्वी तू या जगात आलास आणि आमची दुनिया बनला. तू जन्माच्या पहिल्याच दिवशी हसत होता आणि आणि आज जिथे जातो तिथे हास्य पसरवतोस. माझा सर्वात खरा, सर्वात प्रिय मुलगा... मी तुझ्यावर प्रेम करते आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या पाठीशी राहण्याचे वचन देते... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी अल्लाहला प्रार्थना करते की तुला जे हवे ते मिळो."
32 वर्षीय सानिया 6 वेळा ग्रँड स्लॅम विजेती राहिली आहे. आई बनल्यानंतर सानियाने टेनिसमधून काही काळ ब्रेक घेतला होता. पण, टेनिस कोर्टावर पुनरागमन करण्यासाठी ती खूप मेहनत करत आहे. सानिया पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्नानंतर दुबईमध्ये स्थायिक झाली.