Dhyan Chand Birthday Special: मेजर ध्यानचंद यांचा आज 115वा वाढदिवस, जाणून घ्या ऑलिम्पिक सुवर्णयुगाचे शिल्पकार असे बनले बनले 'हॉकीचे जादुगार'
मेजर ध्यानचंद

Major Dhyan Chand Birthday: आज 'हॉकीचे जादूगार' म्हणून ओळखल्या जाणार्‍या मेजर ध्यानचंद (Major Dhyan Chand) यांचा वाढदिवस आहे. आजचा दिवस भारतात खेल दिन (Sports Day) म्हणूनही साजरा केला जातो. ध्यानचंद (Dhyan Chand) हे देशाचा सर्वात प्रतिष्ठित आणि महान खेळाडू मानले जाते. आजच्या दिवशी राजीव गांधी खेल रत्न, अर्जुन, ध्यानचंद पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येतात. हॉकीच्या या दिग्गजने जर्मन हुकूमशहा हिटलरपुढे (Hitler) देखील गुढघे टेकले नाही. त्यांचा जन्म 1905 मध्ये अलाहाबाद (Allahabad) येथे झाला. प्रयागराज (तत्कालीन अलाहाबाद) मध्ये जन्मलेले ध्यानचंद यांना क्रीडा जगात 'दादा' म्हणून संबोधले जाते. सहावी पर्यंत शिक्षण पूर्ण करत ध्यानचंद 1922 मध्ये सैन्यदलात भरती झाले. सूर्यास्तानंतरही ते समर्पणाने सराव करायचे, म्हणूनच सहकारी त्यांना 'चांद' असेही म्हणतात. पुढे जाऊन त्यांनी इतिहास घडविला. ध्यानचंद यांना ऑलिम्पिक सुवर्णयुगाचे (Olympic Golden Era) शिल्पकार देखील होते. 1928, 1932 आणि 1936 मध्ये सलग तीन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताला सुवर्णपदक जिंकवले. (On This Day in 1936: ‘भारत विक्रीसाठी नाही,’ असं उत्तर देत मेजर ध्यानचंद यांनी 15 ऑगस्ट रोजी धुडकावून लावला होता हुकूमशाह हिटलरचा प्रस्ताव)

आज त्यांच्या वाढदिवशी आपण जाणून घेऊया काही न ऐकलेले किस्से ज्यांनी त्यांना बनवले-'हॉकी विझार्ड'. ध्यानचंद यांनी आपल्या कारकीर्दीत 400 हून अधिक गोल केले. 1928 अ‍ॅमस्टरडॅम ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी भारताकडून सर्वाधिक 14 गोल केले. त्या वेळी एका वृत्तपत्राने लिहिले की, "ती हॉकी नव्हती तर जादू होती. आणि ध्यानचंद हा हॉकी विझार्ड आहे." 1932 ऑलिम्पिकमध्ये भारताने अमेरिकेला हॉकीच्या फायनलमध्ये 24-1 असे पराभूत केले. या सामन्यात ध्यानचंद यांनी 8 तर त्यांचा धाकटा भाऊ रूप सिंहने 10 गोल केले. 1932 लॉस एंजेलिस ऑलिंपिक स्पर्धेत भारताने दुसरे हॉकी सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत भारताने केलेल्या एकूण 35 गोलांपैकी 25 गोल या दोन भावाच्या स्टिकमधून निघाले. क्रिकेटमध्ये आजवरचे महान फलंदाज मानले जाणारे सर डॉन ब्रॅडमन यांनी 1935 मध्ये ध्यानचंद यांची भेट घेतली आणि त्यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले की, क्रिकेटमध्ये धावा केल्या जातात त्याप्रकरे ते गोल करतात.

विशेष म्हणजे, ध्यानचंद यांच्या हॉकीच्या स्टिकमध्ये चुंबकसारखे काही आहे का ते तपासण्यासाठी नेदरलँडच्या अधिका्यांनी त्यांची हॉकी स्टिक तोडली. ध्यानचंद यांच्या करिअरमधील प्रसिद्ध किस्सा म्हणजे त्यांची आणि जर्मन हुकूमशाह हिटलर यांची 1936 ऑलिम्पिक दरम्यानची भेट. जर्मनीविरुद्ध अंतिम सामना 14 ऑगस्ट 1936 रोजी होणार होता, पण त्यादिवशी खूप पाऊस पडला. म्हणून दुसर्‍या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी सामना खेळला गेला. त्या दिवशी बर्लिनच्या हॉकी स्टेडियमवर फायनल पाहण्यासाठी 40,000 लोकं उपस्थित होते ज्यात हिटलर देखील सामील होता. त्यांच्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने जर्मनीच्या वतीने हॉकी खेळण्याची ऑफर दिली होती, परंतु मेजर ध्यानचंद यांनी त्यास नकार दिला आणि सांगितले की आपला देश भारत आहे आणि तो त्यासाठीच खेळेल.

आज त्यांचा 115 वा वाढदिवस असून संपूर्ण राष्ट्र या महान व्यक्तिमत्त्वापुढे नतमस्तक आहे. सर्व क्रीडा पुरस्कार असूनही त्यांच्या योगदानाची दखल घेऊन भारतरत्न देण्याची मागणी बऱ्याच काळापासून सुरू आहे, पण या दिग्गजाला हा सन्मान कधी मिळतो हे पाहणे बाकी आहे. लेटेस्टलीकडून मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली.