On This Day in 1936: ‘भारत विक्रीसाठी नाही,’ असं उत्तर देत मेजर ध्यानचंद यांनी 15 ऑगस्ट रोजी धुडकावून लावला होता हुकूमशाह हिटलरचा प्रस्ताव
मेजर ध्यानचंद, हिटलर (Photo Credit: Wikimedia Commons and PTI)

15 ऑगस्ट, 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य (Indias Independence) मिळण्याच्या 11 वर्षांपूर्वी मेजर ध्यानचंदच्या (Mayor Dhyan Chand) नेतृत्वात भारतीय हॉकी टीमने (Indian Hockey Team) करिष्मा करत इतिहासाची नोंद केली जेव्हा जर्मनीचा हुकूमशाह हिटलरच्या उपस्थितीत बर्लिन ऑलिम्पिक (Berlin Olympics) फायनलमध्ये भारताने जर्मनीला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. भारताचे ऑलिम्पिकमध्ये हे सलग तिसरे सुवर्णपदक होते. यापूर्वी भारतीय टीमने 1928 आम्सटरडॅम, त्यानंतर लॉस एंजेलिस आणि बर्लिनमध्ये जिंकले. जर्मनीविरुद्ध विजय महत्त्वपूर्ण आहे. त्या ऑलिम्पिक सामन्याची कहाणी आणि हिटलरने (Hitler) ध्यानचंद यांना जर्मन नागरिकत्व देण्याची ऑफर भारतीय हॉकी दिग्गजांमध्ये प्रख्यात आहे. ही घटना आहे बर्लिन ऑलम्पिकमधील. भारत-जर्मनीमधील हा सामना पाहण्यासाठी हुकूमशाह हिटलर देखील पोहचणार होता. मागील दोन वेळा चॅम्पियन्स इंडियाने सेमीफायनल सामन्यात फ्रान्सला 10-0 ने पराभूत केले. या सामन्यात ध्यानचंद यांनी चार गोल केले. (On This Day in 1990: सचिन तेंडुलकरने आजच्या दिवशी 30 वर्षांपूर्वी सुरु केला होता शतकांच्या शंभरीचा प्रवास, 17 व्या वर्षी ठोकली पहिली टेस्ट सेन्चुरी)

फायनलमध्ये जर्मन डिफेंडर्सनी ध्यानचंदला घेराव घातला आणि जर्मन गोलरक्षक टिटो वॉर्नहोलझकडून त्यांचा दातही तुटला. ब्रेकमध्ये तो आणि त्याचा भाऊ रूप सिंह यांनी घसरण्याच्या भीतीने शूज काढले आणि अनवाणी पायाने खेळले. ध्यानचंदने तीन आणि रूप सिंहने दोन गोल करत भारताला 8-1 ने विजय मिळवून दिला. पण, त्यानंतर जे घडलं ते भारतासाठी सुवर्ण पदकापेक्षाही अभिमानास्पद होतं. सामना बघण्यासाठी आलेल्या हिटलरने ध्यानचंद यांच्या कामगिरीला सलाम केला आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात हिटलरने ध्यानचंद यांना जर्मनीच्या लष्करात जर्मनीचं नागरिकत्व व सामील होण्याचा प्रस्ताव दिला. ज्यावर ध्यानचंद यांनी ‘भारत विक्रीसाठी नाही,’ असं उत्तर देत ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्ताव धुडकावून लावला.

या सामन्याची अजून एक गोष्ट जी अद्याप लोकांना माहिती नाही ती म्हणजे जेव्हा सर्व टीम खेळाडू विजय साजरा करत होते ध्यानचंद सर्व देशांचे झेंडे लहरत होते तेथे ते उदास बसले होते. या बाबत जेव्हा त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले की, "आपण युनियन जॅकऐवजी तिरंग्याखाली जिंकलो असतो आणि आमचा तिरंगा येथे उडत असता.'' तो ध्यानचंद यांचा अखेरचा ऑलिम्पिक होता. तीन ऑलिम्पिकमधील 12 सामन्यात त्यांनी 33 गोल केले.