Coronavirus: इंग्लिश प्रीमियर लीगच्या क्लबमधील आणखी चार जणांना कोरोनाची बाधा, संक्रमितांची संख्या 12 वर पोहचली
Picture used for representational purpose (Photo Credits: Getty Images)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फुटबॉल क्षेत्रावर प्रभाव वाढत चालला आहे. चार खेळाडूंची कोरोना व्हायरससाठी सकारात्मक चाचणी आल्याचे इंग्लिश प्रीमियर लीगने बुधवारी जाहीर केले. “प्रीमियर लीग (Premier League) आज याची पुष्टी करू शकेल की सोमवारी 25 मे आणि मंगळवार 26 मे रोजी 1008 खेळाडू आणि क्लब स्टाफची कोविड-19 (COVID-19) चाचणी घेण्यात आली. त्यापैकी वेगवेगळ्या तीन क्लबकडून खेळणाऱ्या चार जणांची टेस्ट सकारात्मक आली आहे," असे लीगने एका निवेदनात म्हटले आहे. सकारात्मक चाचणी असलेले खेळाडू किंवा क्लब कर्मचारी आता सात दिवसांच्या कालावधीसाठी स्वत:ला क्वारंटाइन करतील. मागील आठवड्यात, मंगळवारी खेळाडू मर्यादित गट प्रशिक्षणात परतले. यासह इंग्लंडच्या टॉप-फ्लाइट क्लबमध्ये व्हायरसच्या आजवर 12 सकारात्मक चाचण्यांची पुष्टी झाली आहे. मार्चपासून प्रीमियर लीगमध्ये कोणतेही सामने खेळले गेलेले नाहीत, परंतु सरकारने एलिट खेळासाठी 1 जूनपासून पुन्हा सुरुवात करण्यास मान्यता दिली आहे. (Coronavirus: कोरोना व्हायरसचा केंद्रबिंदू असलेल्या वुहानमध्ये परतला फुटबॉल, तीन महिन्याच्या लॉकडाउननंतर सरावासाठी खेळाडू मैदानावर)

गेल्या आठवड्यात, 19-22 मे दरम्यान कोविड-19 साठी 996 खेळाडू आणि क्लब स्टाफची चाचणी घेण्यात आली होती, ज्यातील दोन क्लबकडून खेळणारे दोन खेळाडू कोरोना संक्रमित असल्याचे समोर आले होते. 17-18मे रोजी सुमारे 748 खेळाडू आणि क्लब स्टाफची कोरोना चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये सहा जणांची चाचणी पॉसिटीव्ह आली. दरम्यान, प्रीमियर लीग पुढे म्हणाले की, चौथ्या फेरीच्या चाचणीसाठी प्रत्येक क्लबला उपलब्ध असलेल्या चाचण्यांची संख्या 50 वरून 60 पर्यंत केली जाईल.

यापूर्वी बुधवारी, प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी 20 क्लबने एकमताने मतदान केले. याचा अर्थ असा आहे की टीम आता एक गट म्हणून प्रशिक्षण करू शकतील आणि कोणताही अनावश्यक निकटचा संपर्क कमी करतांना सामोरे जायला सक्षम असतील. 13 मार्चपासून सर्व एलिट फुटबॉल खेळांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगिती देण्यात अली होती. कोरोना व्हायरसने आजवर जगभरात 3.5 लाखाहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.