कोरोना विषाणूचा (Coronavirus) केंद्रबिंदू असलेल्या चीनच्या वुहान (Wuhan) शहरातील सामान्य आयुष्य आता हळूहळू पट्रीवर येताना दिसत आहे. जवळपास तीन महिन्यांपासून कैदेत असलेल्या फुटबॉलरनेही (Football) मैदानावर उतरण्यास सुरवात केली आहे. करोनामुळे जवळपास तीन महिने फुटबॉलपासून दूर राहणाऱ्या वुहानमध्ये खेळाडूंसह नागरिकांनी सोमवारपासून मैदानांवर फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. वुहानची लोकसंख्या 1 करोड 10 लाख आहे आणि एप्रिलमध्ये संपलेल्या जवळपास तीन महिन्यांच्या लॉकडाउननंतर येथे आता हौशी फुटबॉलर्सनीही क्रीडा उपक्रम सुरू केले आहेत. अॅमेच्योर फुटबॉलर वांग जीजुन (Wang Zijun) म्हणाले, “आम्हाला बराच काळ लॉकडाउनमध्ये रहावं लागलं जिथे आम्ही फक्त काही कसरत करू शकत होतो. मी घरातच माझ्या मुलाबरोबर फुटबॉल खेळायचो." चिनी सुपर लीग संघ वुहान जॉल आणि तृतीय स्तरीय संघ वुहान थ्री टाउन्स या दोन्ही संघ उद्रेकामुळे इतरत्र प्रशिक्षित केल्या नंतर मध्यवर्ती शहरात परतले आहेत. (धक्कादायक! Corona च्या पार्श्वभूमीवर लिवरपूल-एटलेटिको मैड्रिड फुटबॉल सामन्यामुळे अतिरिक्त 41 जणांचा मृत्यू)
वेन नावाच्या एका खेळाडूने सांगितले की लॉकडाउन होण्यापूर्वी प्रत्येकजण अत्यंत अस्वस्थ होता. लॉकडाउनमधील निर्बंध काढल्यावर आम्ही आठवड्यातून एकदा सराव सुरू केला आहे. मी खूप आनंदी आहे व्यावसायिक फुटबॉल खेळाडूंवर याचा परिणाम झाला. चिनी महिला टीम स्टार आणि वुहान निवासी वांग शुआंग यांनीही पुन्हा सराव सुरू केला आहे. ती टोकियो ऑलिम्पिकसाठी टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.
काही नागरिकांनी सुरक्षित अंतराचे भान न राखता आणि मास्क न लगावत मुक्त सराव केला, परंतु खेळाडूंनी मात्र चेहऱ्यावर मास्क लावून सराव करण्यास प्राधान्य दिले. दरम्यान, देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आलेली चिनी सुपर लीग (Chinese Super League) यंदा जून महिन्यात पुन्हा सुरू होऊ शकते. ही लीग 22 फेब्रुवारी रोजी सुरु होणार होती, मात्र कोरोनाचा धोका लक्षात घेत लीगला स्थगित करण्यात आले.