जगभरात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या 55 लाखांच्या वर पोहचली आहे. कोरोना संकटात अनेक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण, लीग/मालिका रद्द होण्यापूर्वी अखेरच्या एका सामन्यामुळे 41 जणांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ब्रिटनमधील (Britain) लॉकडाउन होण्याआधी चॅम्पियन्स लीगमधील एटलेटिको मैड्रिड (Atletico Madrid) आणि लिवरपूल (Liverpool) शेवटचा सामना खेळवण्याचा निर्णय देशाला महागात पडला आहे. एटलेटिको मैड्रिड आणि लिवरपूल टीममधील यूईएफए चॅम्पियन्स लीग (UEFA Champions League) सामना खेळवण्याचा निर्णयामुळे कोरोना व्हायरसच्या संसर्ग झाल्यामुळेअतिरिक्त 41 मृत्यू झाल्याचं संडे टाईम्सने नमूद केले. संडे टाइम्सने हेल्थ रिसर्च एजन्सीच्या अहवालाचा हवाला देऊन दावा केला. 11 मार्च रोजी एनफिल्ड येथे शेवटच्या 16 सामन्यात ज्यर्गेन क्लोपच्या टीमचा स्पॅनिश क्लबशी सामना झाला ज्यात तब्बल 52,000 प्रेक्षक उपस्थित होते. 11 मार्च रोजी दोन्ही टीममध्ये हा सामना खेळण्यात आला होता. चॅम्पियन्स लीगमधील हा प्री-क्वार्टर-फायनल सामना होता. (Coronavirus: फुटबॉल जगावर कोरोनाचा कहर सुरूच, मैक्सिको क्लब Santos Laguna टीम मधील 8 फुटबॉलपटू COVID-19 बाधित)
संडे टाइम्सने (Sunday Times) दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सुविधेतून मिळालेल्या आकड्यांचा अभ्यास करण्यात आला. वृत्तपत्रानुसार, एज हेल्थ (Edge Health) रिसर्चचा असा अंदाज आहे की सामन्यानंतर 25 ते 35 दिवसानंतर स्टेडियम जवळील रुग्णालयांमध्ये कोरोनामुळे 41 लोकांचा मृत्यू झाला, जे उर्वरित रुग्णालयांपेक्षा जास्त आहे. लंडनच्या इम्पीरियल कॉलेज आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने असा अंदाज लावला आहे की ज्यावेळी सामना झाला त्यावेळी ब्रिटनच्या 1 लाख रुग्णांच्या तुलनेत स्पेनमध्ये 6 लाख 40 हजार लोकं कोरोना संक्रमित होते. अशा परिस्थितीत स्पेनहून सामन्यासाठी ब्रिटनमध्ये आलेले चाहते संक्रमित असल्याची भीती आहे.
गेल्या महिन्यात लिवरपूलचे महापौर स्टीव्ह रोथर्म यांनीही सामन्याच्या चौकशीची मागणी केली होती. ब्रिटनमध्ये लॉकडाउन लागू होण्यापूर्वी हा क्लबमधील शेवटचा प्रमुख फुटबॉल सामना होता. हा सामना पाहण्यासाठी स्पेनमधील तीन हजार चाहत्यांचा देखील समावेश आहे. सामन्यात एथलेटिको ने उपांत्य फेरीच्या सामन्यात गतविजेत्या चॅम्पियन लिवरपूलला अतिरिक्त वेळेत 3-2 असे पराभूत केले आणि क्वार्टर-फायनलमध्ये स्थान मिळवले. दुसरीकडे, चॅम्पियन्स लीगशिवाय दक्षिण-पश्चिम इंग्लंडमधील चेल्टनहॅम फेस्टिव्हलमुळे कोरोना-संक्रमित लोकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले. येथे 4 दिवस हॉर्स रेसिंग खेळवण्यात आली. एज हेल्थ रिसर्च एजन्सीच्या म्हणण्यानुसार या शर्यतीमुळे 37 अतिरिक्त मृत्यू झाले.