कोविड-19 (COVID-19) ने जगभरात जगभर थैमान घातले आहे. संक्रमितांची संख्या 50 लाखांच्या वर पोहचलाई आहे. खेळ विश्वावरही कोरोनाचा (Coronavirus) कहर पाहायला मिळत आहे. या व्हायरसमुळे संपूर्ण वर्षांचा क्रीडा कार्यक्रम ठप्प झेल आहे तर आता खेळाडूंना संसर्ग झाल्याची बातमीही येऊ लागली आहे. फुटबॉल खेळाडू संक्रमित झालेल्यांचे वृत्त अनेकदा समोर आले आहे. आणि आता मेक्सिकोतील (Mexico) सांतोस लागुना (Santos Laguna) या अव्वल संघातील आठ फुटबॉलपटूंना करोनाचे संक्रमण झाल्याचे क्लबने म्हटले आहे. तब्बल दोन महिन्याच्या स्थगितीनंतर लिगा एमएक्स (LIGA MX), मेक्सिकोची राष्ट्रीय फुटबॉल लीग या आठवडय़ाच्या अखेरीस पुन्हा सुरू होणार होती, पण खेळाडूंना या व्हायरसची लागण आता लीग सुरुवात होण्यास अडचण निर्माण झाली आहे. लीगा एमएक्स पुढे म्हणाले की, फेडरल गव्हर्नमेंट हेल्थ सेक्रेटेरियातर्फे स्थापन झालेल्या प्रोटोकॉलचे पालन करत सांतोसा खेळाडू पाळत ठेवले जाईल. (प्रेक्षक सीटवर सेक्स डॉल बसवल्याबद्दल FC Seoul क्लबवर दक्षिण कोरिया फुटबॉल लीगने ठोठावला विक्रमी 100 मिलियन वोनचा दंड)
लागुना फुटबॉल क्लबचे मालक अलेजांद्रो इरारागोरी यांनी स्थानिक टीव्ही चॅनेलला सांगितले की, "या निकालामुळे लीगचे जीर्णोद्धार प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे." ते म्हणाले की एकूण 48 खेळाडू आणि प्रशिक्षकांची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी केवळ 22 चे निकाल समोर आले आहेत. आगामी काळात उर्वरित चाचण्यांचाही निकालही जाहीर होईल.
दुसरीकडे, युरोपियन फुटबॉलमध्येही बरीच खेळाडू कोरोना व्हायरसच्या जाळ्यात सापडले आहे. प्रीमियर लीग फुटबॉल क्लब सराव करण्यासाठी परतल्यानंतर, त्यांच्यावर कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली. प्रीमियर लीगने एका निवेदनात म्हटले की, "प्रीमियर लीगने आज याची पुष्टी केली की 17 मे रविवारी आणि 18 मे रोजी कोविड -19 साठी 748 खेळाडू आणि क्लब स्टाफची चाचणी घेण्यात आली. यातील तीन क्लबमधील सहा जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे." दरम्यान, या संकट काळात बुंडेस्लिगा लीग सुरु झाली आहे. लॉकडाउननंतर सुरू होणारी ही पहिली युरोपियन लीग बनली परंतु कोरोना संक्रमणाचा धोका अजूनही कायम आहे.