MS Dhoni (Photo Credit - Twitter)

भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) सध्याच्या आयपीएल हंगामानंतर क्रिकेटमधून निवृत्ती होणार असल्याचे संकेत दिले आहेत. चेन्नईच्या होम ग्राउंड चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळविल्यानंतर कर्णधार धोनीने आपले मत मांडताना सांगितले की "सध्या तो त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असून त्याचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे" धोनीच्या या विधानानंतर त्याच्या चाहत्यांच्या काळजात धकधक वाढू लागली आहे. त्याच्या या विधानामुळे त्याच्या चाहत्यांना देखील एक धक्का बसला आहे.

पहा व्हिडिओ -

सामना जिंकल्यानंतर धोनीने हर्षा भोगलेसोबत मॅचनंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये बोलताना सांगितले त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा अखेरचा टप्पा आहे. 41 वर्षीय धोनीने स्वतः सांगितले की त्याला त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्याचा आनंद घ्यायचा आहे. धोनी म्हणाला, “मी कितीही वेळ खेळलो तरी चालेल, पण हा माझ्या कारकिर्दीचा हा शेवटचा टप्पा आहे. त्याचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. दोन वर्षांनंतर चाहत्यांना इथे येऊन पाहण्याची संधी मिळाली आहे. इथे येऊन छान वाटतं. प्रेक्षकांनी आमच्यावर भरभरून प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव केला आहे.”

एमएस धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारत फक्त आयपीएल खेळत आहे. भारताचा सर्वात यशश्वी कर्णधारापैरी एक कर्णधार म्हणून त्याच्या कडे पाहिली जाते. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसीच्या सर्व महत्त्वाच्या ट्राफी जिंकल्या आहेत.