ICC World Cup 2019: अंगठ्याच्या दुखापतीनंतर शिखर धवन याने राहत इंदोरीं च्या कवितेद्वारे केली भावना व्यक्त
Shikhar Dhawan (Photo Credits: Twitter/ BCCI)

दुखापतीमुळे विश्वकप साठीच्या भारतीय संघातून बाहेर पडलेल्या शिखर धवन (Shikhar Dhawan) ने  एका ट्विट द्वारे आपली भावना व्यक्त केली आहे. धवन ने आपल्या ट्विटरवर डॉ राहत इंदोरी (Dr Rahat Indori) ची एक कविता शेअर केली. त्याने इंदोरी यांच्या कवितांमधून त्याचा हेतू  हि दर्शविला.

ती कविता अशी आहे कि, 'कही महक की तरह हम गुलों से उड़ते हैं...

कभी धुएं की तरह हम पर्बतों से उड़ते हैं...

ये कैंचियां हमें  रोकेंगी...

के हम पैरों से नहीं हौसलों  है...'

दरम्यान, धवनला निरीक्षकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. टीम इंडिया फिजियो पॅट्रिक फरहार्टने ( Patrick Farhart) खात्री करुन घेताहेत की धवन लवकरात लवकर सज्ज होऊन भारतीय संघात पुनः सहभागी ह्वावा.

धवनला ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध सामान्य दरम्यान उजव्या बोटाला दुखापत झाली होती. या नंतर धवन ला 3 आठवड्यांसाठी आराम देण्यात आले आहे. विश्वचषकाच्या भारतीय संघाच्या दुसर्‍या सामन्यात धवनने 117 धावा करत ऑस्ट्रेलियाला 253 रन्सच आव्हान देण्यात मोठा वाटा उचलला होता.