भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज लक्ष्मण शिवरामकृष्णन (Laxman Sivaramakrishnan) यांनी माजी ऑफ स्पिनर राजेश चौहान (Rajesh Chauhan) आणि डावखुरा फलंदाज अमय खुर्सिया (Amay Khurasiya) यांच्यासह राष्ट्रीय निवड समितीच्या (Selectors Committee) पदासाठी अर्ज केला आहे. या तिन्ही माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी निवड समितीच्या सदस्य पदासाठी अर्ज केल्याची पीटीआयद्वारे पुष्टी केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख शुक्रवार, 24 जानेवारी आहे. बीसीसीआय सध्याच्या समितीतून एमएसके प्रसाद (दक्षिण विभाग) आणि गगन खोडा (मध्य विभाग) यांची बदली करणार असून सरनदीप सिंह (उत्तर विभाग), जतिन परांजपे (पश्चिम विभाग) आणि देवानंग गांधी (पूर्व विभाग) यांना अजून एका हंगामासाठी कायम ठेवणार आहे. भारतासाठी बेन्सन अँड हेजेस क्रिकेट वर्ल्ड चॅम्पियनशिपचे हिरो राहिलेले शिवकरामकृष्णन 20 वर्षांपासून भाष्यकार आहेत आणि आयसीसी क्रिकेट समितीचे सदस्य होण्याबरोबरच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षकही आहेत.
दरम्यान, माजी जुनिअर मुख्य निवडकर्ता व्यंकटेश प्रसाद आणि माजी भारतीय फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर हेदेखील अर्ज करू शकतात ज्यामुळे अध्यक्षपदासाठीची शर्यत रोचक ठरणार आहे. शिवरामकृष्णनने नऊ कसोटी आणि 16 वनडे सामन्यांसह 25 आंतरराष्ट्रीय, तर बांगरने 12 कसोटी आणि 15 वनडे मिळून 27आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. प्रसादने यापैकी बहुतेक सामने 33 कसोटी आणि 161 वनडे खेळले आहेत, परंतु जुनिअर राष्ट्रीय निवड समितीत अडीच वर्षाचा कार्यकाळ मिळाला असल्याने ते केवळ दीड वर्ष ज्येष्ठ निवडकर्ता म्हणून पदभार सांभाळू शकतात.
चौहान यांना 21 टेस्ट आणि 35 वनडे मालिकेत अनुभवी असून अनिल कुंबळे आणि व्यंकटपति राजू यांच्यासमवेत खेळले आहेत. खुर्सिया यांनीही अर्ज भरल्याची पुष्टी केली.