ईद मुबारक! इरफान पठाण, मोहम्मद कैफ समवेत भारतीय क्रिकेटपटुंनी ईद उल फित्रच्या निमित्तानं चाहत्यांना दिल्या विशेष शुभेच्छा
इरफान पठाण (Photo Credit: IrfanPathan/Instagram)

भारतीय संघाचे माजी सदस्य पठाण बंधू-इरफान (Irfan Pathan) आणि युसूफ पठाण (Yusuf Pathan) यांनी ईद उल फित्रच्या (Eid ul-Fitr) निमित्तानं चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद मुबारक, असं म्हणत पठाण बंधूंनी चाहत्यांना इंस्टाग्राम व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा सर्वांपर्यंत पोहोचवल्या. जग कोरोना व्हायरस संकटाला सामोरे जात असल्यामुळे यंदा ईदचा हा सण आपले मुस्लिम बांधव अगदी सध्या पद्धतीने साजरा करणार आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात रोजा ठेवल्यानंतर, सर्वत्र आज ईद साजरी होत आहे. पण, या पर्वाला कोरोनाच्या संकटाचं गालबोट लागलं आहे. कोविड 19 चा प्रादुर्भाव पाहता देशभरातीत अनेक मशीदही बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. संकटाच्या याच वेळी इरफानने अतिशय सकारात्मक अशा शुभेच्छा दिल्या. इरफान म्हणाला, "रमजानचा महिना खूप सोपा होता, ईदही सोपी आहे." इरफानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याचा भाऊ युसूफ आणि वडील शुभेच्छा देताना दिसत आहेत. (Eid-ul-Fitr 2020: इरफान पठान सांगतोय लॉकडाऊन दरम्यान घरी नमाज पठण कसे कराल; पहा व्हिडिओ)

भारतात एकीकडे आज ईद साजरी होत आहे, तर काही ठिकाणी 24 मे रोजी ईद साजरी केली गेली. मोहम्मद कैफ आणि रशीद खान यांनी त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. लोकांना ईदची नमाज घरी राहून करण्याची विनंती आणि सरकारने ठरवलेल्या सामाजिक अंतरांच्या निकषांचे पालन करावे असे आवाहन करण्यासाठी इरफानने काल आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्टद्वारे केले.

पाहा तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे ट्विट:

इरफान पठाण

 

View this post on Instagram

 

Eid Mubarak everyone. Khushiyan baato:) #eid #love #happiness @yusuf_pathan

A post shared by Irfan Pathan (@irfanpathan_official) on

मोहम्मद कैफ

व्हीव्हीस लक्ष्मण

रशीद खान

शिखर धवन

दरम्यान, कोरोनाचं सावट असल्यामुळे दिल्लीतील जामा मशीदही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी दिल्ली, मुंबई आणि इतरही ठिकाणीच्या मुस्लिम धर्मीयांकडून ईदच्या निमित्तानं घराबाहेर न पडता घरात राहूनच या दिवसाची नमाज अदा करण्याचं आवाहन करण्यात आलं. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करण्याचं आवाहन सर्वांनाच करण्यात आलं आहे. ईदच्या निमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे उत्साही वातावरण दिसणार नसलं तरीही सामाजिक बांधिलकी जपत हा सण अनोख्या पद्धतीनं साजरा करण्याकडेही अनेकांचा कल दिसत आहे.