नेट्समध्ये दिव्यांग मुलाची घातक गोलंदाजी पाहून व्हीव्हीएस लक्ष्मण थक्क, पाहून तुम्हीही कराल सलाम, पाहा प्रेरणादायी Video
दिव्यांग मुलाची घातक गोलंदाजी पाहून व्हीव्हीएस लक्ष्मण थक्क (Photo Credit: Instagram)

सोशल मीडियावर बर्‍याच वेळा असे व्हिडिओ किंवा फोटो पाहिले जातात, ज्यात प्रत्येकाचे मन एखाद्या व्यक्तीच्या सामर्थ्याला अभिवादन करावेसे वाटते. भारतीय टीमचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनीही रविवारी असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 11 हजाराहून अधिक धावा करणाऱ्या लक्ष्मणने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे. या मुलाच्या शक्तीला तुम्हाला सलाम देखील करायला आवडेल. हा दिव्यांग मुलग (Specially-abled) ज्या प्रकारे नेट्समध्ये गोलंदाजी करत आहे तो पाहून लक्ष्मण देखील त्याचे कौतुक करण्यापासून रोखू शकला नाही. रविवारी लक्ष्मणने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिव्यांग मुलाला गोलंदाजी करतानाचा हा व्हिडिओ खरंच कित्येकांसाठी प्रेरणादायी आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि मिताली राज यांनीही या व्हिडिओला पसंत केले. (सौरव गांगुली ने शेअर केली बाल्कनी फोटो, यूजर्सना आली 2002 NatWest मालिकेची आठवण, पाहा व्हायरल पोस्ट)

व्हिडिओ सामायिक करताना 45-वर्षीय लक्ष्मणने लिहिले, "माणसाची भावना ही त्याची क्षमता, चिकाटी आणि धैर्य असते जी कोणतीही स्थिती चोरू शकत नाही. मानवी सहनशक्ती आणि सामर्थ्याला सलाम.” लक्ष्मणने यापूर्वी लडाखमधीलकोविड-19 पॉसिटीव्ह शिक्षकाचे कौतुक केले होते. “लेह येथील गणिताचे शिक्षक किफायत हुसैन कोविड-19 पॉसिटीव्ह असूनही ते आयसोलेशन केंद्रातून आपल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लास घेत आहे. ही प्रेरणादायी भावना आहे,” लक्ष्मणने त्या व्यक्तीच्या फोटोसह ट्विट केले होते.

पाहा लक्ष्मणने शेअर केलेला हा व्हिडिओ:

दरम्यान, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या प्रकल्प व्हिजन प्रोग्रामचा फलंदाजी सल्लागार म्हणून लक्ष्मण बंगालच्या क्रिकेटपटूंसोबत ऑनलाईन सत्रेही करीत आहे. लक्ष्मणने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये अनेक वेगवेगळ्या सक्षम क्रिकेटपटूंचे रूप एकाचवेळी दाखविण्यात आले आहे. एक अपंग मुलगा गोलंदाजी, तर काही फलंदाजी करत आहे. शिवाय, त्यांचे क्षेत्ररक्षण पाहून पूर्णपणे तंदुरुस्त क्रिकेटपटूही थक्क होतील अशी आहे.