सौरव गांगुली ने शेअर केली बाल्कनी फोटो, यूजर्सना आली 2002 NatWest मालिकेची आठवण, पाहा व्हायरल पोस्ट
सौरव गांगुली (Photo Credit: Twitter)

बुधवारचा दिवस कोलकाता रहिवाश्यांसाठी त्रासदायक सिद्ध झाला. पश्चिम बंगालमध्ये अम्फानचे वादळ (Cycolne Amphan) पाहायला मिळाले. ताशी 160 ते 180 किलोमीटरच्या वादळामुळे राज्यात बर्‍याच प्रमाणात नुकसान झाले. कोलकातामध्ये जीव आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, रस्त्याच्या कडेला उभी असलेली जुनी झाडे उखडून पडली. या वादळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांचेही नुकसान झाले. बीसीसीआय (BCCI) प्रमुख गांगुलीच्या घरीही आंब्याचे झाड पडले. ज्याचा फोटो स्वत: माजी कर्णधार यांनी शेअर केला. गांगुलीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दोन फोटो शेअर केले ज्यात गांगुली आपल्या घराच्या बाल्कनीत दिसत आहे. दादांला बाल्कनीत उभा पाहून चाहत्यांना पुन्हा एकदा 2002 ची नेटवेस्ट मालिका (NatWest Series) आठवली. 2002 च्या नेटवेस्ट फायनलमध्ये भारताने इंग्लंडचा पराभव केला आणि जिंकल्यावर गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीमधून आपली  जर्सी फाहरावली होती. (Cyclone Amphan: चक्रीवादळ अम्फानने केलेली हानी पाहून विराट कोहली, केएल राहुल दुखी; बाधित झालेल्यांच्या सुरक्षिततेसाठी केली प्रार्थना)

गांगुलीने फोटो शेअर केले आणि लिहिले - "घरातल्या आंब्याच्या झाडाला उचलायला लागलं, परत उचललं आणि ठीक केलं." गांगुलीच्या या पोस्टला यूजर्सकडून भरपूर प्रतिसाद मिळाला. चाहत्यांनीही गांगुलीच्या कार्याचे कौतुक केले.

सोशल मीडियावर चाहत्यांनीही गांगुलीच्या या पोस्टविषयी अनेक मजेदार टिप्पण्याही केल्या. वीर-जारा आणि टायटॅनिकच्या प्रेमकथेपेक्षा दादा आणि बाल्कनीचे नाते चांगले असल्याचे काही चाहत्यांनी सांगितले.

दादा आणि बाल्कनी ...

दादा टी शर्ट

लॉर्ड्सची बाल्कनी जास्त शोभते तुम्हाला

ट्वायलाइटपेक्षा चांगली कथा

आणखी एक बाल्कनी शो!

आत्मनिर्भर दादा

पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये बुधवारी अम्फानच्या वादळामुळे मोठे नुकसान झाले. बंगालमध्ये वादळामुळे झाडे कोसळली, तर काही ठिकाणी रस्ते जाम झाले. या आपत्तीत 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याचे सामोर आले आहे.