चक्रीवादळ अ‍ॅम्फानने केलेली हानी पाहून विराट कोहली दुखी (Photo Credits: PTI/Getty)

चक्रीवादळ अम्फानने (Cyclone Amphan) भारतामध्ये (India) मोठा विनाश केला आहे. या वादळामुळे बंगालमध्ये मृतांची संख्या 12 लोकांपर्यंत पोहोचली आहे. संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी झुंज देत असताना चक्रीवादळ अम्फानने बुधवारी कोलकातासह (Kolkata) बांग्लादेशच्या पूर्वेकडील शहरांमध्ये कहर केला आणि यात किमान 15 जण ठार झाले. ओडिशामधेही 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडिया आणि वाहिन्यांवरील विनाशकारक फोटो आणि व्हिडिओ समोर येताच, भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी ट्विटरवर बाधित झालेल्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. चक्रीवादळाचा प्रभाव अशा प्रकारे झाला आहे की पश्चिम बंगालमधील चक्रीवादळाच्या क्षेत्रात असंख्य लोक वीज आणि संपर्काशिवाय रहात आहेत. राज्यात विनाश एवढा मोठा झाला आहे की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यास 'कोविड -19 पेक्षा मोठी आपत्ती' असे वर्गीकृत केले आहे. (Cyclone Amphan: चक्रीवादळ 'अम्फान'चा कहर, कोलकाता विमानतळाचा एक भाग पाण्याखाली, पहा व्हिडिओ)

"ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील चक्रीवादळ अम्फानने बाधित झालेल्या प्रत्येकासाठी माझ्या भावना आहेत. देव तेथील प्रत्येकाचे रक्षण करो आणि गोष्टी लवकर बऱ्या होतील अशी आशा आहे," कोहलीने ट्विट केले.

राहुलने ट्विटरवर लिहिले, "अम्फान सुपर चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना. बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना सहानुभूती."

भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवनेही ट्विटरवर तुफानात आपल्या प्रियजनांना गमावलेल्याच्या कुटूंबियांबद्दल शोक व्यक्त केले.

दुसरीकडे, चक्रीवादळामुळे भारत आणि बांग्लादेशमधील काही भागांत तब्बल 19 लाख मुलं 'नजीकच्या धोक्यात' असल्याचा UNICEF ने असा दावा केला. आपत्ती व्यवस्थापन आणि मदत करणार्‍या संस्थांना सर्वात मोठे आव्हान म्हणजे कोविड-19 ची सावधगिरी लक्षात ठेवून कोट्यवधी लोकांचे तेथून स्थलांतर करणे. या वादळामुळे होणाऱ्या विनाशाची चित्रे खूप भयानक आहेत. कुठेतरी बसांवर झाडे कोसळली आहेत, तर कुठेतरी घरांचे छप्पर उडत आहे.