Umesh Yadav | (Photo Credits- Twitter @ICC)

वेस्टइंडीज विरुद्ध पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यासाठी शार्दुल ठाकूर ऐवजी उमेश यादवला संघात स्थान दिले गेले आहे. ठाकूरला दुसऱ्या कसोटी सामन्यात घेण्यात आलं होतं, परंतु फक्त १० चेंडू टाकल्यानंतर तो दुखापतीमुळे माघारी परतला. त्याचा हा पहिलाच अंतराष्ट्रीय कसोटी सामना होता. त्याच्या अनुपस्थितीत मात्र उमेश यादवने वेस्टइंडीज फलंदाजांना एका मागोमाग एक परतीचा रस्ता दाखवला. त्याने दोन्ही डावात मिळून एकूण १० बळी मिळवले. त्याच्या याच कामगिरीवर निवड समितीने त्याला संघात घायचे ठरवले आहे. नक्की वाचा: India vs West Indies ODI 2018: मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम मोडण्याची कोहलीला 'विराट' संधी.

उमेश यादव आता पर्यंत ७३ एकदिवसीय सामने खेळला असून त्याने १०५ बळी घेतले आहेत. भारत आणि वेस्टइंडीज पहिला एकदिवसीय सामना २१ ऑक्टोबरला गुवाहाटी येथे खेळणार आहेत.