वेस्टइंडीज संघाला कसोटी मालिकेत २-० ने धूळ चारल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचं लक्ष आता एकदिवसीय मालिकेकडे वळले आहे. कसोटी पाठोपाठ एकदिवसीय मालिकेत सुद्धा भारताकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. कर्णधार विराट कोहली सुद्धा दमदार फोर्मात असून आता त्याला सचिन तेंडूलकरच्या रेकॉर्डचे वेध लागले आहेत. आगामी एकदिवसीय मालिकेत विराट कोहली वेस्टइंडीज विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाला मागे टाकू शकतो.
सचिनने वेस्टइंडीज विरुद्ध ३९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५२.७३ च्या सरासरीने १५७३ धावा केल्या आहेत. तर विराटने २७ सामन्यांमध्ये ६०.३० च्या सरासरीने १३८७ धावा केल्या आहेत. कोहलीला केवळ १८७ धावांची आवश्यकता आहे. नक्की वाचा: ICC Test Rankings 2018: भारत पहिल्या स्थानावर कायम; विराट कोहलीसुद्धा फलंदाजीत No. 1.
तिसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार राहुल द्रविड असून त्याने ४० सामन्यांमध्ये १३४८ धावा केल्या आहेत. तर सौरभ गांगुली ११४२ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. भारत पहिला एकदिवसीय सामना २१ ऑक्टोबरला गुवाहाटी येथे खेळणार आहे.