ICC Test Rankings 2018: भारत पहिल्या स्थानावर कायम; विराट कोहलीसुद्धा फलंदाजीत No. 1
Indian Cricket Team | (Photo Credits- Twitter @BCCI)

वेस्टइंडीज विरुद्धच्या मालिकेत निर्भेळ यश प्राप्त केल्यानंतर भारताने कसोटी क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. भारताने पहिला सामना हा एक डाव आणि २७२ रुन्सने जिंकला होता तर दुसऱ्या सामन्यात १० विकेट्सने खिशात घातला होता. या कामगिरीचा भारताला फायदा झालेला आहे. भारताच्या खात्यात ११६ गुण असून, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया १०६ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

 

आयसीसी कसोटी क्रमवारी:

1) भारत – 116 गुण

2) दक्षिण आफ्रिका – 106 गुण

3) ऑस्ट्रेलिया – 106 गुण

4) इंग्लंड – 105 गुण

5) न्यूझीलंड – 102 गुण

6) श्रीलंका – 97 गुण

7) पाकिस्तान – 88 गुण

8) वेस्ट इंडिज – 76 गुण

9) बांगलादेश – 67 गुण

10) झिम्बाब्वे – 2 गुण

या शिवाय ऋषभ पंत आणि पृथ्वी शॉने पण दमदार आगेकूच करत बढती मिळवली आहे. मालिकावीराचा पुरस्कार जिंकणाऱ्या पृथ्वीला ६० वे स्थान मिळाले असून, ऋषभ पंत ६२ व्या स्थानावर आहे. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने आपले अव्वल स्थान कायम राखले. गोलंदाजीत उमेश यादव हा २५ व्या स्थानावर आहे.