न्यूझीलंड, वेस्ट इंडिज (Photo Credit: Twitter/cricketworldcup)

दक्षिण आफ्रिकामध्ये सध्या अंडर-19 विश्वचषक (World Cup) स्पर्धा खेळवली जात आहे. विश्वचषकच्या दुसऱ्या क्वार्टर फाइनल सामन्यात न्यूझीलंड (New Zealand) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघ आमने-सामने आले. या सामन्यादरम्यान युवा किवी खेळाडूंनी खेळाडूवृत्तीचे दर्शन घडवले. वरिष्ठ पुरुष संघाने अनेक वेळा क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांची मने जिंकली आहेत, पण यावेळी न्यूझीलंड अंडर-19 खेळाडूंनी असे काही केले जे पाहून तुम्हाला आनंद होईल. वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात कर्क मॅकेन्झी (Kirk McKenzie) याने 99 धावा केल्या. तो मैदानातून रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर पॅव्हिलिअनमध्ये परतला, पण शेवटच्या वेळी पुन्हा एकदा फलंदाजीस आला. वेस्ट इंडिजकडून बाद होणार तो शेवटचा फलंदाज होता. बाद झाल्यानंतर त्याची प्रकृती इतकी बिकट होती की त्याला उभे राहणेही शक्य नव्हते. किवी संघातील दोन खेळाडूंनी या दरम्यान पुढाकार घेतला आणि कर्कला उचलून मैदानाबाहेर नेले. (U19 World Cup 2020: ऑस्ट्रेलियाविरुद्ध 74 धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने मोडला जागतिक विक्रम)

कर्क 43 षटकात 103 चेंडूंत 99 धावांवर नाबाद असताना क्रॅम्पचा त्रास झाल्यामुळे तो मैदानाबाहेर गेला. वेस्ट इंडीजने 9 वी विकेट गमावली तेव्हा तो पुन्हा 48 व्या ओव्हरमध्ये फलंदाजीस आला. किवीच्या क्रिस्चियन क्लार्कने त्याला बोल्ड केले. त्याच्या पायाला क्रॅम्सप होत्या आणि त्याला त्रास जाणवत होता. मैदानाबाहेर जाताना त्याला चालवतही नव्हते तेव्हा कीवी संघाच्या दोन खेळाडूंनी त्याला खांद्याच्या मदतीने उचलले आणि मैदानातून बाहेर नेले. याचा व्हिडिओ आयसीसीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. पाहा किवी खेळाडूंच्या खेळाडूवृत्तीचा हा व्हिडिओ:

वेस्ट इंडीज पहिले फलंदाजी करत 47.5 ओव्हरमध्ये 238 धावांवर ऑलआऊट झाले. यानांतर किवी संघाने सहज विजय मिळवला आणि सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले. सुपर लीगचा हा दुसरा क्वार्टर फायनल सामना होता. यापूर्वी झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.