U19 World Cup 2020: ऑस्ट्रेलियाविरुद्ध 74 धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने मोडला जागतिक विक्रम
भारत अंडर-19 संघ  (Photo Credit: Twitter)

आयसीसी अंडर-19 विश्वचषकच्या (World Cup) क्वार्टर-फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाला (Australia) 74 धावांनी पराभूत करून टीम इंडियाने (India) सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले. प्रियाम गर्ग (Priyam Garg) याच्या नेतृत्वाखालील भारताने दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या अंडर-19 वर्ल्डकपमध्ये विजयी घुडदौड कायम ठेवली आहे. ऑस्ट्रेलियालाने टॉस जिंकून भारताला पहिले फलंदाजीसाठी बोलावले. अशाअधे पहिले फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये केवळ 9 बाद 234 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 234 धावांचे आव्हान ठेवले. परंतु कार्तिक त्यागी (Kartik Tyagi) आणि आकाश सिंहच्या नेतृत्वाखालील भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा क्रम उधळला आणि त्यांना 43.3 ओव्हरमध्ये 159 धावांत गुंडाळले. असे करत, अंडर -19 विश्वचषकात भारताने सलग दहा विजय मिळवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी, ऑस्ट्रेलिया अंडर-19 आणि भारताने संयुक्तपणे 2002-2004 दरम्यान 9 सामने जिंकले होते. (U19 WORLD CUP 2020: टीम इंडियाची विश्वचषक सेमी फायनल मध्ये धडक; ऑस्ट्रलियाचा गेम ओव्हर)

पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील भारत अंडर-19 संघाने 2018 मधील विश्वचषकमध्ये सर्व नाबाद सहा सामने जिंकले होते आणि संध्यच्या 2020 मध्ये सध्या चारही सामने जिंकले आहेत. 2002 च्या आवृत्तीत ऑस्ट्रेलियाने खेळलेले सर्व आठ सामने जिंकले आणि 2004 च्या संस्करणात विजयासह प्रारंभ केला. दुसरीकडे, 2008-2010 आणि 2012-2014 या कालावधीत भारताने सलग 8 सामने जिंकले आहेत. स्पर्धेत लागोपाठ 8 किंवा अधीक सलग सामने जिंकण्यामधे बांग्लादेश आणि पाकिस्तान या संघांचाही समावेश आहे.

क्वार्टर-फायनल सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, यशस्वी जयस्वाल आणि अथर्व अंकोलेकर यांनी अर्धशतकी खेळी केली, तर कार्तिक त्यागी याने 4, आकाश सिंहने 3 गडी बाद केले.  सामन्यातील शानदार गोलंदाजीबद्दल कार्तिकला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. कार्तिकने आठ ओव्हरमध्ये 24 धावांवर चार गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाच्या दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात केली. कांगारू संघाने अवघ्या 17 धावांवर चार गडी गमावले होते. ऑस्ट्रेलियाकडून सॅम फेनिंगने सर्वाधिक 75 धावा केल्या.