अंडर 19 क्रिकेट विश्वचषक (Under 19 Cricket Worldcup) स्पर्धेत टीम इंडियाने (Team India) उपांत्य फेरीत (Semi Finals) धडक मारत ऑस्ट्रेलियाचा 74 धावांनी पराभव केला आहे . टीम इंडियाने दिलेले 234 धावांचे आव्हान पूर्ण करू न शकल्याने ऑस्ट्रेलियन संघाचा (Team Australia) विश्वचषक स्पर्धेतील गेम ओव्हर झाला आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या धुव्वाधार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या 159 धावांत गारद झाला. भारताचा फास्ट गोलंदाज कार्तिक त्यागी (Kartik Tyagi) याने 24 धावांत 4 बळी घेऊन मॅन ऑफ द मॅचचा (Man Of The Match) किताब पटकावला आहे. U19 World Cup 2020: सर्वाधिक धावा, सर्वोच्च धावसंख्या; अंडर-19 विश्वचषकमधील 'हे' प्रमुख रेकॉर्डस् जाणून घ्या
वास्तविक टीम इंडियाची पहिली इंनिग ही काही फार समाधानकारक झाली नव्हती, सलामीचा फलंदाज दिव्यांश सक्सेना अवघ्या 14 धावांवर आउट झाल्याने सुरुवातीपासूनच परिस्थिती बिकट होती. त्यानंतर थोड्या थोड्या वेळानेच फलंदाज बाद होत गेल्याने भारतीय संघासमोरील अडचणीत वाढ झाली. ओपनिंग बॅट्समॅन यशस्वी जयस्वाल याने सामन्यात बाजू वर उचलून धरत सर्वाधिक 62 धावांची खेळी साकारली. मात्र जयस्वाल बाद झाल्यानंतर टीम इंडिया संकटात आली होती. अशावेळी मुंबईकर अथर्व अंकोलेकर याने 54 चेंडूत 55 धावांची नाबाद खेळी साकारत टीम इंडियाची धावसंख्या 233 पर्यंत पोहचवली.
तर दुसऱ्या इंनिंग मध्ये ऑस्ट्रेलियाला 234 चे आव्हान देऊन टीम इंडियाने सुरुवातीपासूनच दमदार गोलंदाजी कायम ठेवली होती. आजच्या विजयासह टीम इंडिया अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत ग्रुप A मध्ये सर्वाधिक पॉईंट्स मिळवून सेमी फायनल मध्ये दाखल झाली आहे.