IND vs NZ 2nd T20 Live Streaming: भारतासाठी आजचा सामना असेल करो किंवा मरो, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार लाइव्ह
IND vs NZ (Photo Credit - Twitter)

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील दुसरा सामना (2nd T20) रविवारी लखनऊमध्ये (Lucknow) खेळवला जाणार आहे. भारतासाठी हा सामना करो किंवा मरो असेल. हा सामना गमावल्यास टीम इंडिया टी-20 मालिकाही गमावेल. पहिल्या टी-20 मध्ये न्यूझीलंडने 21 धावांनी विजय मिळवला. हार्दिक पांड्याने त्याच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत प्रत्येक टी-20 मालिका जिंकली आहे आणि त्याला या मालिकेतही पुनरागमन करायला आवडेल. त्याचबरोबर न्यूझीलंडचे कर्णधारपद मिचेल सँटनरच्या हाती आहे. गेल्या सामन्यात सँटनरनेही उत्तम कर्णधारपदासह अप्रतिम गोलंदाजी केली. त्याचवेळी डेव्हॉन कॉनवे आणि डॅरिल मिशेल यांनी न्यूझीलंडला केन विल्यमसनची उणीव जाणवू दिली नाही.

भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण 23 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 10, तर किवी संघाने 10 सामने जिंकले आहेत. तीन सामने बरोबरीत आहेत. दोन्ही संघ भारतात नऊ वेळा आमनेसामने आले आहेत. यातील टीम इंडियाने पाचवेळा, तर न्यूझीलंडने चार सामने जिंकले. लखनौच्या एकना स्टेडियमवर दोन्ही संघ प्रथमच भिडणार आहेत. (हे देखील वाचा: IND Women's Under 19 T20 Final Live Streaming: भारताकडे आज क्रिकेट विश्वचषक जिंकण्याची मोठी संधी, कुठे पाहणार सामना; घ्या जाणून)

कुठे पाहणार सामना?

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणारा दुसरा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07.00 वाजता सुरू होईल. नाणेफेक सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 6.30 वाजता होईल. टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या T20 सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या अनेक चॅनेलवर पाहता येईल. याशिवाय डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हॉटस्टारचे सदस्यत्व असलेले वापरकर्ते ऑनलाइन स्ट्रीमिंगद्वारे सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

दोन्ही संघ

भारतीय संघ: शुभमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, पृथ्वी शॉ, युझवेंद्र चहल, जितेश शर्मा , मुकेश कुमार.

न्यूझीलंड संघ: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, हेन्री शिपले, मायकेल रिप्पन, डेन क्लीव्हर, बेन लिस्टर.