सचिन तेंडुलकरचे वनडे दुहेरी शतक (Photo Credits: Twitter)

किक्रेट जगतमधील सर्वोकृष्ट खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी आजच्या दिवशी विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. सचिन तेंडुलकर यांनी 16 मार्च 2012 रोजी आंतराराष्ट्रीय क्रिकेट मध्ये शतकांचे शतक करुन इतिहास रचला होता. तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर आजपर्यंत हा विक्रम अबाधित आहे. आजच्या दिवशी त्यांनी एशिया कप स्पर्धेत बांगलादेशच्या शेर-ए-बांगला मैदानात ही कामगिरी बजावली होती. दरम्यान, त्यांनी 114 धावसंख्या उभारली होती. हे शतक एकदिवसीय क्रिकेटमधील 49 वे शतक होते. तसेच सचिन तेंडुलकर हे आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतक झळकवणारे एकमेव खेळाडू आहेत. आजही त्यांनी केलेला विश्वविक्रम कायम आहे. 100 शतकासोबत 16 मार्च हा दिवस सचिनसाठी आणखी एका कारणामुळे खास आहे. 2005 साली पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात सचिनने आपली 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. सचिन यांनी 2013 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली. त्यानंतर अनेक वर्ष सचिन यांचे अनेक विक्रम अबाधित आहेत.

आशिया चषकादरम्यान बांगलादेशविरुद्ध शेर-ए-बांगला मैदानात सचिन यांनी 114 धावांची धमाकेदार खेळी केली होती. याआधी सचिनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतके जमा होती. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यात झळकावलेले शतक हे सचिन यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले 100 शतक ठरले. तब्बल एका वर्षाच्या कालावधीनंतर सचिनने हे शतक झळकावल्यामुळे त्याच्या या खेळीला महत्व प्राप्त झाले होते. हे देखील वाचा- Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद जर्मनीत अडकला; महिना अखेरपर्यंत भारतात परतता येणार नाही

फेसबूक पोस्ट-

सचिन तेंडुलकर यांनी कसोटी सामन्यात 15 हजार धावा केल्या आहेत. यामुळे सचिन तेंडुलकर यांना मास्टर ब्लास्टर म्हणून नावाजले जाते. सचिन यांनी केलेले काही विक्रम आजही कायम आहेत. सचिन तेंडुलकर यांनी 24 वर्षाच्या कारकर्दीत 463 एकदिवसीय सामने खेळून 18 हजार 426 धावा ठोकल्या आहेत. यात एकूण 49 शतकांचा समावेश आहे. तर, 200 कसोटी सामन्यात त्यांनी 51 शतक ठोकण्याची कामगिरी बजावली आहे.