Viswanathan-Anand (Photo Credit: Getty Image)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातले असून यामुळे आतापर्यंत 6 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच खबरदारीचा उपाय म्हणून अनेक देशांनी परदेशातून ये-जा करणारी विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच फटका भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand) याला बसला आहे. आनंद बुद्धिबळ स्पर्धेसाठी जर्मनीत (Germany) गेला होता. परंतु, कोरोना व्हायरसमुळे त्याचा तेथील मुक्काम वाढला आहे. सोमवारी तो भारतात येणे अपेक्षित होते. मात्र, मार्च महिना अखेरपर्यंत त्याला भारतात परतता येणार नसल्याचे समजत आहे. सध्या आनंद हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाशी आणि मित्रांशी संपर्क साधत आहे. तसेच आयुष्यात प्रथमच माझ्या आणि कदाचित अनेकांना स्वतःला सर्वांपासून दूर ठेवावे लागण्याची पहिली आहे, अशी प्रतिक्रीया आनंदने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात कहर केला आहे. आतापर्यंत 70 हून अधिक देश कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. यात जर्मनीचाही समावेश आहे. दरम्यान, भारताचा दिग्गज बुद्धिबळ खेळाडू आनंद फेब्रवारी महिन्यात जर्मनीत गेला होता. परंतु, जर्मनीतही कोरोना व्हायसरचे रुग्ण आढळत असल्याने जर्मनीने बाहेर देशातून ये-जा करणारी विमानसेवा रद्द केली आहे. यामुळे आनंद जर्मनीत अडकला आहे. तो आता जर्मनीत सर्वांपासून वेगळा राहत आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या परिवारांशी संपर्क साधत असल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना आनंद म्हणाला की, माझ्यासाठी हा एक विलक्षण अनुभव आहे. आयुष्यात प्रथमच माझ्या आणि कदाचित अनेकांना स्वतःला सर्वांपासून दूर ठेवावे लागण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रीया त्याने दिली आहे. दिवसातून एक फोन घरच्यांना करतो. व्हिडीओ कॉल करून मुलगा अखिल आणि पत्नी अरुणा यांच्याशी संवाद साधतो. आम्ही एकमेकांसोबत सकारात्मक गोष्टींवर चर्चा करत असतो, असेही आनंद म्हणाला आहे. हे देखील वाचा- Coronavirus: क्रिकेटपटू धवल कुलकर्णी म्हणाला सलाम BMC! मुंबई महापालिका म्हणाली 'हे तर आमचे कर्तव्य'

महत्वाचे म्हणजे, आनंद सध्या जर्मनीत असल्यामुळे त्याची पत्नी अरुणा खूपच काळजीत आहे. अरुणा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की, “आनंद तिथे आहे हे आश्चर्यकारक आहे. पण तिथे खचलेल्या इतरांपेक्षा त्यांची परिस्थिती चांगली आहे, याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यांची खूप आठवण करतो. याशिवाय, सतत त्यांना हात धुवायला सांगतो. तसेच खाण्यापिण्याची काळजी घेण्यास सांगतो”, असे आनंद यांची पत्नी अरूणा म्हणाली आहे. या महिन्याच्या अखेरीस आनंदला भारतात आणले जाईल अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

कोरोना व्हायरस संसर्गामुळे जगभरातील अनेक देश चिंतेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, सध्या चीनमध्ये कोरोना व्हायरसने बाधित झालेल्या मृतांच्या आकडेवारीत घट झाल्याचे समजत आहे. यामुळे कोरोना व्हायरचे प्रमाण लवकरच कमी होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, इटली कोरोना व्हायरसशी झुंज देत असतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यानंतर इराण, अमेरीका, भारतासह अनेक देशांत कोरोना व्हायरचे रुग्ण आढळून आले आहेत. सुरुवातीला केवळ चीन मध्ये दाखल झालेला कोरोना व्हायरसने जगभरातील 70 हून अधिक देशांच्या चिंतेत वाढ केली आहे. यामुळे कोरोनापासून कसा बचाव करता येईल, असा प्रश्न अनेक देशांसमोर पडला आहे