1.लियम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) पंजाब किंग्स – 11.50 कोटी
सिक्सर किंग म्हणून ओळख असणाऱ्या इंग्लंडचा या युवा खेळाडूने आयपीएलमध्ये सर्वांचीच मने जिंकली . पंजाब किंग्जकडून खेळतांना लियम लिव्हिंगस्टोनने 14 सामन्यात 36.42 च्या सरासरीने 437 धावा केल्या. यावर्षी पंजाब किंग्जकडून सर्वाधिक धाव करणाऱ्यांच्या यादीत तो फक्त शिखर धवन च्या मागे होता . लियम लिव्हिंगस्टोनने आयपीएल 2022 मध्ये 34 षटकार मारले आणि सीझनमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत दुसरे स्थान मिळवले. तर गुजरात टायटन्स विरुद्ध मोहम्मद शमीच्या चेंडूवर त्याने तब्ब्ल 117 मीटरचा षटकार मारला जो IPL 2022 मध्ये क्रिकेट चाहत्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू होता.
The L in IPL stood for Livingstone this #IPL2022, don't you agree #SherSquad? 😉#SaddaPunjab #PunjabKings #LiamLivingstone #ਸਾਡਾਪੰਜਾਬ @liaml4893 pic.twitter.com/vQ0SZhqUal
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) June 2, 2022
2.वानिंदू हसरंगा ( Wanindu Hasaranga) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – 10.75 कोटी
श्रीलंकेचा फिरकी गोलंदाजीचा जादूगार म्हणून ओळख असणारा वानिंदू हसरंगा 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा हिस्सा बनला. त्याचे बॉलिंग व्हेरिएशन ओळखणे बॅट्समनसाठी खूप कठीण होते. पर्पल कॅपच्या शर्यतीत वानिंदूने दुसरे स्थान पटकावले आणि त्याच्या डोक्यावर पर्पल कॅपचा मुकुट घेण्यापासून तो फक्त एक विकेट दूर राहिला. हसरंगाने या मोसमात 16 सामन्यात 16.54 च्या सरासरीने 26 विकेट घेतल्या. त्याने एका मॅच मध्ये पाच बळीही घेतले. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला क्वालिफायर मध्ये नेण्यात वानिंदू हसरंगाचा मोठा वाटा होता.
Wanindu “Magic” Hasaranga. 🤙🏻😎
Raised the standards and his performances with each game. 🙌🏻#PlayBold #WeAreChallengers #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/P8AnBhjoed
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 30, 2022
3. क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) लखनौ सुपर जायंट्स– 6.75 कोटी
आयपीएल 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या यष्टिरक्षक-फलंदाज 2022 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग झाला. लखनौ सुपर जायंट्सकडून खेळतांना क्विंटन डी कॉकने 15 सामन्यात 36.29 च्या सरासरीने 508 धावा केल्या.तर क्विंटन डी कॉक ने कर्णधार केएल राहुलसह एक उत्कृष्ट सलामीची जोडी तयार केली ज्याने बहुतेक सामन्यांमध्ये विरोधी संघावर वर्चस्व गाजवले. त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 70 चेंडूत 140* धावा केल्या, ज्या या मोसमातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आणि स्पर्धेच्या इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या होती.
Tan tana tan Quinton maara! 💯 Player of the match and our hearts tonight 💙🔥 @QuinnyDeKock69 #AbApniBaariHai💪 #IPL2022 🏆 #bhaukaalmachadenge #LSG #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #lsg2022 pic.twitter.com/gEk06GBQyh
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 18, 2022
4. युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) राजस्थान रॉयल्स – 6.50 कोटी
दीर्घकाळ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा सदस्य असणारा चहल यंदा राजस्थान रॉयल्स कडून खेळताना दिसला. चहलने यंदा राजस्थानसाठी दमदार कामगिरी करत राजस्थानच्या चाहत्यांना अनेक आठवणी दिल्या. चहलने 17 सामन्यांत 19.51 च्या सरासरीने 27 बळी घेत पर्पल कॅप जिंकली.त्याने एका कोलकाता विरुद्ध पाच बळी घेतले ज्यात हॅटट्रिकचाही समावेश होता. चहलने त्याच्या लेग-स्पिन आणि गुगलीच्या विविधतेत अनेक फलंदाजांना अडकवले. (हे देखील वाचा; IND vs SA T20 Series 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका या धुरंधर खेळाडूंसाठी निर्णायक, मिळू शकते T-20 विश्वचषकचे तिकीट)
Purple 🧢 ✅
Most wickets by a spinner in an IPL season ✅
Yuzi in Pink is such a treat. 😍💗 pic.twitter.com/QU6aKCSrw6
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 29, 2022
5. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) सनराईजर्स हैदराबाद – 6.50 कोटी
मूळचा पंजाबचा असणाऱ्या या युवा अष्टपैलू खेळाडूने आयपीएल 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अनकॅप्डखेळाडू म्हणून ओळख निर्माण केली. अभिषेक शर्माने सनराईजर्स हैद्राबादसाठी या मोसमात 14 सामने खेळले असून 30.43 च्या सरासरीने 426 धावा केल्या.आयपीएल 2022 मध्ये हैद्राबादसाठी तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.अभिषेकने या मोसमात ओपनिंग करतांना काही अप्रतिम खेळी खेळल्या आणि तो खूप प्रभावी दिसत होता.
Thumbs-up if you can't wait for the clash of the table-toppers? 👍#GTvSRH 🔜@IamAbhiSharma4 | #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/5yUmdHlWSu
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 26, 2022