IND vs SA T20 Series 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका या धुरंधर खेळाडूंसाठी निर्णायक, मिळू शकते T-20 विश्वचषकचे तिकीट
हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

IND vs SA T20I Series 2022: नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल नंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात T20 मालिकेसाठी येणार असून या मालिकेला 9 जून पासून सुरवात होणार आहे. तसेच या मालिकेसाठी भारताच्या स्टार खेळाडूंनी पुनरागमन केले असून ही मालिका त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे . दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील त्यांच्या कामगिरीच्या जोरावरच  त्यांना T20 विश्वचषकचे तिकीट मिळेल का नाही याचा निर्णय घेण्यात येईल .आयपीएल एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या मुळे नेहमीच  खेळाडूंना त्यांचा फॉर्म दाखवण्याची संधी मिळते .   तर हे पाच धुरंदर खेळाडू कोण आहेत चला पाहुयात. (IND vs SA Series 2022: IPL गाजवणाऱ्या ‘या’ तगड्या खेळाडूंवर असेल सर्वांची नजर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत करतील धमाल)

1. हार्दिक पांड्या (Hardik Pandya)

हार्दिक पांड्या दुखापतीमुळे बराचकाळ भारतीय संघातून बाहेर होता . पण आयपीएलमध्ये जोरदार कामगिरीच्या बळावर त्याने  गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघाला फ़क्त  विजेतेपद मिळवून दिले नाहीतर आयपीएलमध्ये आपल्या  ऑल राउंड कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात दनक्यात पुनरागमन केले . हार्दिक गुजरातसाठी आणि आयपीएल मधे सर्वाधिक धावा करणारा दूसरा प्लेयर आहे.

2. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)

खरतर ज्या वयात खेळाडू रिटायरमेंट घेतात त्या वयात दिनेश कार्तिकने भारतीय संघात स्थान मिळवून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. गेली काही वर्षे कार्तिक भारतीय संघातून बाहेर होता पण या आयपीएलमध्ये ‘फिनिशर’ दिनेश कार्तिकचा कमालीचा फॉर्म सर्वानीच पहिला . संपूर्ण आयपीएल मध्ये दिनेश कार्तिकने रॉयल चॅलेंजर बंगळुरूसाठी (Royal Challengers Bangalore) मॅच फिनिशरची भूमिका चोख बजावली आणि सेलेक्टर्सला  संधी देण्यात भाग पाडले . आता अफ्रीकेविरुद्ध मालिकेत त्याने आपला फॉर्म कायम ठेवल्यास त्याला विश्वचषक संघात देखील स्थान मिलु शकते.

3 . व्यंकटेश अय्यर (Vyankatesh Iyyer)

आयपीएल 2021  मधे केलेल्या कामगिरीच्या जोरावर व्यंकटेश अय्यर ने लगेचच भारतीय संघात स्थान मिळवले. पण यंदाचा आयपीएलचा हंगाम हा व्यंकटेश अय्यरसाठी फरसा चांगला ठरला नाही . म्हणून जर त्याला भारतीय विश्वचषक संघात स्थान मिळवायचे असेल तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मलिका त्याच्यासाठी अतिशय निर्णायक ठरेल.

4.उमरान मलिक (Umran Malik)

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) च्या या वेगवानगोलंदाजाच्या  स्पीडची कमाल पूर्ण आयपीएलमधे आपल्याला पहायला मिळाली . प्रत्येक मॅच मधे त्याने 150 किमी पेक्षा अधिक वेगाने बॉलिंग करून सगळ्या फलंदाजांच्या नाकात दम केला. तसेच हैदराबादसाठी त्याने सर्वाधिक 22 विकेट्स घेतल्या तर आयपीएल मधला दूसरा सर्वात वेगवान बॉल 157 किमी  टाकायचा एक रिकॉर्डही बनवला होता.

5 . कुलदीप यादव (Kuldeep Yadav) 

कुलदीप यादव हा बऱ्याच कालावधिपासून भारतीय संघासोबत जोडला गेला आहे . पण प्रत्यक्षात त्याला प्लेइंग 11 मधे खेळण्याची संधी फार कमी मिळाली. पण आयपीएलच्या या हंगामात त्याने लक्षवेधी कामगिरी करून तो फॉर्म मधे असल्याचे दाखवले . म्हणून जर त्याला  विश्वचषक संघात स्थान कायम ठेवायचे असेल तर त्याला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दमदार  कामगिरी करावी लागेल.