(Photo Credit-Getty)

आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध विजय मिळवत टीम इंडिया (Team India) ने सेमीफाइनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. संघाने आपल्या तिन्ही विभागात (फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग) सातत्य दाखवले आहे. मात्र, मागील काही सामन्यात माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) च्या खेळीने चाहते निराश झाले आहेत. त्यामुळे, तज्न आणि चाहत्यांमध्ये त्यांच्या खेळातून निवृत्तीबाबत चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, क्रिकेट क्षेत्रात बोलले जात आहे की विश्वकपमधील टीम इंडिया चा शेवटचा सामना धोनीचा ही ब्लू जर्सीमध्ये अंतिम सामना असू शकतो. याआधी धोनीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. (भारतीय फलंदाज अंबाती रायुडू ची क्रिकेटमधून निवृत्ती, World Cup साठी वारंवार केले जात होते दुर्लक्ष)

पीटीआयला बीसीसीआय (BCCI) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "धोनी कधीही निवृत्ती जाहीर करू शकतो. त्यानं देशासाठी खुप केलं आहे. याआधी त्यानं कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता कारण त्याला फलंदाजीवर लक्षकेंद्रित करायचे होते. सध्या वर्ल्ड कपमध्ये त्याचा फॉर्म चांगला आहे त्यामुळं तो निवृत्ती जाहीर करू शकतो".

दरम्यान, जर टीम इंडियाने फाइनल गाठले आणि 14 जुलै रोजी लॉर्ड्स (Lords) मध्ये विश्वकप जिंकला तर धोनीसाठी एक चांगले फेअरवेल गिफ्ट असेल. याआधी धोनीवर अफगाणिस्तान आणि इंग्लंड विरुद्ध धिम्या गतीनं फलंदाजी केल्यामुळं टीका करण्यात आली होती. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये धोनीचा स्ट्राईक रेट सर्वात कमी आहे. त्यामुळे धोनीवर सतत टीका केली जात आहे. भारतासाठी धोनीच्या कामगिरी बद्दल बोलले तर, धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 चा टी-20 विश्वकप (T20 World Cup), 2011 आयसीसी विश्वकप आणि 2013 मध्ये आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy) जिंकण्याची कामगिरी केली आहे.