Team India Selection Controversy: अभिमन्यु ईश्वरनच्या स्थानावरून टीम मॅनेजमेंट-निवडकर्त्यांमध्ये बिनसलं, वादाने करून दिली जुन्या प्रकरणांची आठवण
विराट कोहली (Photo Credit: PTI)

Team India Selection Controversy: बंगालचा सलामीवीर अभिमन्यु ईस्वरनच्या (Abhimanyu Easwaran) इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघात (Indian Team) राखीव सलामी फलंदाज म्हणून निवडीबाबत चेतन शर्माच्या नेतृत्वातील राष्ट्रीय निवड समिती (Selection Committee) आणि टीम इंडिया (Team India) संघ व्यवस्थापनात वाद सुरु आहे. यामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) देखील सामील आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात शुबमन गिल (Shubman Gill) दुखापतग्रस्त असल्याचे उघडकीस आले होते. ज्यांनंतर दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्ध (England) होणाऱ्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे गिलऐवजी संघात कोणाला स्थान द्यावे? असा प्रश्न संघ व्यवस्थापकांना पडला आहे. कर्णधार कोहलीकडे अभिमन्यु सारखा सलामीवीर असताना देखील त्यांनी पृथ्वी शॉला इंग्लंडला पाठवण्याची मागणी केली होती परंतु निवडकर्त्यांनी यावर प्रतिसाद दिला नाही. (IND vs ENG 2021: पृथ्वी शॉ याच्या इंग्लंड वारीवर BCCI अधिकाऱ्याने दिले स्पष्टीकरण, केएल राहुलला मिळू शकते मोठी जबाबदारी)

त्यामुळे पुन्हा एकदा टीम मॅनेजमेंट आणि निवडकर्ते यांच्यात वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन यांच्यातील वाद हा भारतीय क्रिकेटमध्ये पहिलाच प्रकार नाही. यापूर्वीही अशी काही प्रकरणे घडली आहेत जिथे कर्णधाराला हवा असलेला खेळाडू उपलब्ध करून देण्यास निवडकर्त्यांनी नकार दिला आहे.

1. यापूर्वी 60च्या दशकाच्या अखेरीस व 70च्या दशकाच्या सुरुवातीला बंगाल संघाचे एक विकेटकीपर-फलंदाज होते, रुसी जिजीभाई. त्यांनी 46 प्रथम श्रेणी सामने खेळले होते. यामध्ये त्यांची फलंदाजी सरासरी 10.46 होती. भारतीय संघ 1971 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार होता आणि तिसऱ्या विकेटकीपरचे स्थान रिकामे होते. त्यामुळे सर्वांचेच लक्ष दिलीप ट्रॉफी स्पर्धेकडे लागून होते. ईस्ट झोनचे नेतृत्व रमेश सक्सेनाच्या हाती होते. तसेच दलजीत सिंह विकेटकिपिंग करणार होते. या सामन्यात सहभागी झालेल्या एका खेळाडूने पीटीआयला सांगितले की, “निवड समितीचे तत्कालीन अध्यक्ष विजय मर्चंट (पारसी कम्युनिटी स्टॉलवर्ट) यांनी नाणेफेक होण्यापूर्वी रमेश भाईंना बोलावून दलजितला फलंदाज म्हणून आणि रुसीला यष्टिरक्षक म्हणून खेळवण्यास सांगितले. रमेशभाईंना त्यांचा शब्द टाळता आली नाही.” वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी जीजीभाईची निवड झाली जो पहिला आणि शेवटचा दौरा ठरला.

2. नवीन कर्णधार अजित वाडेकर यांना मर्चंटसारख्या दिग्गजासोबत आपल्या निवडीबद्दल वाद घालायचा नव्हता. बंगालचे माजी कर्णधार सांबरन बॅनर्जी यांनी सांगितले की 1979 मध्ये ते सुरिंदर खन्नासमवेत इंग्लंड दौर्‍यावर जाणार होते, पण अखेरीस तमिळनाडूच्या भारत रेड्डीची निवड झाली. तत्कालीन कर्णधार एस वेंकटराघवन देखील तामिळनाडूचे होते.

3. कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि प्रशिक्षक संदीप पाटील 1996 इंग्लंड दौऱ्यावर सौरव गांगुलीला नेण्यास तयार नव्हते, पण त्यावेळी समबरन बॅनर्जी निवडकरता होते आणि निवड समितीचे अध्यक्ष गुंडप्पा विश्वनाथ व किशन रुंगटा यांना राजी करण्यात ते यशस्वी झाले होते.

4. 1997.सहारा कप दरम्यान कर्णधार सचिन तेंडुलकर आणि टीम मॅनेजमेंटला मध्य प्रदेशचा अष्टपैलू जय प्रकाश (जेपी) यादव संघात हवा होता पण निवड समितीचे संयोजक ज्योती वाजपेयी यांनी आपल्या उत्तर प्रदेश राज्यातील ज्योति प्रकाश (जेपी) यादव यांना पाठवले. ज्योतीला एकही सामना खेळण्याची संधीही मिळाली नाही.

5. त्याचप्रमाणे, 1997 वेस्ट इंडिज दौर्‍यामध्ये सचिनला त्याच्या पसंतीचा ऑफस्पिनरही सापडला नाही. त्यानंतर हैदराबादच्या एका निवड समितीने नोएल डेविडच्या निवडीचा आग्रह धरला, ज्यांचे करियर चार एकदिवसीय सामन्यांपुरते मर्यादित होते.

6. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2001 च्या ऐतिहासिक मालिकेत निवडकर्त्यांना शरणदीप सिंह संघात ठेवण्याची इच्छा होती पण गांगुली सहमत नव्हते. त्याला संघात हरभजन सिंह मिळाला आणि आता सर्व इतिहास जमा झाले आहे.

7. एमएस धोनीने 2011 मध्ये मियामी येथे ब्रेकवर असलेल्या त्याचा मित्र रुद्र प्रताप (आरपी) सिंह याला कसोटी संघात स्थान दिले. सिंह फारसी प्रभावी कामगिरी करू शकला नाही आणि त्यानंतर तो पुन्हा कसोटी सामने खेळला नाही.