श्रीलंकेने (Sri Lanka) टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup) दुसऱ्या सामन्यात क्लिनिकल कामगिरी केली आणि बुधवारी अबू धाबी येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात आयर्लंडला (Ireland) पहिल्या फेरीत 70 धावांनी पराभूत केले व सुपर 12 ची पात्रता मिळवली. श्रीलंकेने 171 चा बचाव करताना आयर्लंडला 101 धावांत गुंडाळले आणि ग्रुप 1 मध्ये पहिले स्थान मिळवले. श्रीलंकेने वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) आणि निसांका यांच्यात चौथ्या विकेटसाठी 123 धावांच्या भागीदारीसह 20 षटकांत 7 बाद 171 धावांपर्यंत मजल मारली. यानंतर त्याच्या गोलंदाजांनी आयर्लंडला 18.3 षटकांत 101 धावांवर गुंडाळले. आयर्लंडसाठी कर्णधार अँडी बालबिर्नीने (Andie Balbirnie) 41 आणि कर्टिस कॅम्परने (Curtis Campher) 24 धावा केल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 53 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. 13 व्या षटकात कॅम्पर बाद झाल्यानंतर विकेट पडत राहिल्या. आयर्लंडने शेवटच्या सहा विकेट्स 5.5 षटकांत 16 धावांत गमावल्या. श्रीलंकेकडून महेश टीक्शाने 17 धावा देऊन तीन विकेट घेतल्या.
पहिल्या सामन्यात नामिबियाला सहज पराभूत केल्यानंतर श्रीलंकेला दुसऱ्या फेरीत स्थान मिळवण्यासाठी आणखी एका विजयाची गरज होती. आयर्लंडचे श्रीलंकेपुढे आव्हान होते, जे सोपे होणार नव्हते आणि संघाने अपेक्षेप्रमाणेच सुरुवात केली, ज्यामुळे त्यांच्या दुसऱ्या फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित ठेवल्या. यापुढे आता ग्रुप-A मध्ये सुपर-12 सामन्यात श्रीलंकेचा सामना इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज संघाशी होऊ शकतो. वेस्ट इंडिज टी-20 वर्ल्ड कप गतविजेता म्हणून स्पर्धेत झळकणार आहे. तर इंग्लंड आपले दुसरे जेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असेल. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका देखील पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसरीकडे, अ गटाच्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्स संघाचे पराभवामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर शुक्रवारी आयर्लंड विरुद्ध नामिबिया यांच्यातील लढतीचा विजेता सुपर-12 मध्ये जाईल.
दरम्यान, श्रीलंका सामन्याबद्दल बोलायचे तर महेश थीक्षाना 2014 च्या चॅम्पियनसाठी 17 धावांत 3 विकेट घेऊन उत्कृष्ट गोलंदाज ठरला, तर लाहिरू कुमारा आणि चमिका करुणारत्नेने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. सामनावीर म्हणून निवड झालेल्या हसरंगाने विजेत्या श्रीलंकेसाठी त्याच्या 4 षटकांत 12 धावा देऊन एक विकेट घेतली.